शुभमन गिल कर्णधार, तर रोहित-विराटचं कमबॅक! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्य
बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या दौर्यासाठी भारत पथकाची घोषणा केली: भारतीय संघ या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, ज्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे बऱ्याच काळानंतर पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे, पण शुभमन गिल कर्णधार असणार आहे. भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाला आहे. हा दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान पार पडणार असून यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळले जातील. बीसीसीआयने या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Australia ऑस्ट्रेलियाच्या दौर्यासाठी भारताच्या पथकाने घोषित केले
शुबमन गिल नाव #Teamindia एकदिवसीय सामन्यासाठी कर्णधार
द #ऑसविंड ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध द्विपक्षीय मालिकेत तीन एकदिवसीय आणि पाच टी -20 आहेत pic.twitter.com/l3i2la1dbj
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 4 ऑक्टोबर, 2025
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली. यावेळी वनडे संघासाठी नवीन कर्णधाराचीही घोषणा करण्यात आली. आता शुभमन गिल कसोटीसोबतच वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. म्हणजेच रोहित शर्मा फक्त फलंदाज म्हणून संघात सामील होणार आहेत. विशेष म्हणजे, डिसेंबर 2021 नंतर रोहित पहिल्यांदाच खेळाडू म्हणून संघात निवडला गेला आहे. रोहित शर्मा सोबतच विराट कोहलीचीही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. या दोघांनी शेवटचा सामना भारतासाठी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. म्हणजे जवळपास 7 महिन्यांनंतर हे दोघे पुन्हा मैदानात दिसणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारत पहिल्यांदा वनडे मालिका खेळणार आहे. तसेच, डिसेंबर 2020 नंतर भारत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात वनडे सामने खेळणार आहे.
जसप्रीत बुमराहला विश्रांती
जसप्रीत बुमराहला या दौऱ्यात वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तो सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. तसेच, ऋषभ पंतही या मालिकेतून बाहेर आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याला दुखापत झाल्यामुळे त्याला संघात स्थान मिळालेले नाही. याशिवाय, हार्दिक पांड्याही दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाही.
वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ
शुबमन गिल- कर्नाधार, श्रेयस अय्यर- उपदेशरना, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीष कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हरशीत राणा, मोहम्मद सिराज, अरशदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव ज्युराएल, यशसवी जावल.
ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ
सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार, तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.