India Vs SA Test Series – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ऋषभ पंतचं कमबॅक

BCCI ने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बऱ्याच दिवसांपासून दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेला विस्फोटक फलंदाज ऋषभ पंतची सुद्धा या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून शुभमन गिल कर्णधार असणार आहे.

दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यामध्ये 14 नोव्हेंबर पासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. 14 नोव्हेंबरला पहिला कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना गुवाहटीला खेळला जाणार आहे. World Test Championship 2025-27 च्या साखळीतील टीम इंडियाची ही तिसरी कसोटी मालिका असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप

Comments are closed.