कर्णधार हरमन, तर मानधनाकडे पण मोठी जबाबदारी…; महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा! पहिल
महिला T20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडियाचा संघ : 12 जून 2026 पासून रंगणार्या महिला टी20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने (BCCI) भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचं नेतृत्व अनुभवी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्याकडे सोपवण्यात आलं आहे, तर आक्रमक फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारत आपला मोहिमेचा श्रीगणेशा 14 जूनला करणार असून पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी बर्मिंगहॅममध्ये भिडणार आहे.
महिला T20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडियाचा संघ – (Team India squad for the ICC Womens T20 World Cup 2026 )
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.
प्रतीक्षा संपली! ⌛
🚨 सादर करत आहे #TeamIndiaICC महिला T20 विश्वचषक 2026 साठीचा संघ 🇮🇳
च्या चीअर्स बाहेर आणूया #WomenInblue 🤩#T20WorldCup pic.twitter.com/vZTGtqeTZL
— BCCI महिला (@BCCIWomen) 2 मे 2026
33 सामन्यांचा महासंग्राम!
- महिला टी20 विश्वचषक 2026 चा हा 10वा हंगाम असून, एकूण 12 संघांमध्ये विजेतेपदासाठी जबरदस्त लढत होणार आहे.
- या सर्व संघांना 6-6 अशा दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे.
- भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ग्रुप A मध्ये आहेत.
- या स्पर्धेत एकूण 33 सामने खेळले जाणार असून, अंतिम सामना 5 जुलै 2026 रोजी रंगणार आहे.
- या भव्य स्पर्धेचं आयोजन इंग्लंड आणि वेल्स येथे करण्यात येत आहे.
भारतीय संघाचे वेळापत्रक
14 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान
17 जून: भारत विरुद्ध नेदरलँड्स
21 जून: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
25 जून: भारत विरुद्ध बांगलादेश
28 जून: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारताची पहिल्या विजेतेपदावर नजर
2025 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकलेला भारतीय संघ आता आपल्या पहिल्या टी-20 विश्वचषकावर लक्ष ठेवून आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने सहा वेळा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांनी प्रत्येकी एक चषक जिंकला आहे.
महिला टी-20 विश्वचषक विजेते
2009 : इंग्लंड
2010 : ऑस्ट्रेलिया
2012 : ऑस्ट्रेलिया
2014 : ऑस्ट्रेलिया
2016 : वेस्ट इंडिज
2018 : ऑस्ट्रेलिया
2020 : ऑस्ट्रेलिया
२०२२ : ऑस्ट्रेलिया
2024 : न्यूझीलंड
दोन गट खालीलप्रमाणे
- गट अ : भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलिया.
- गट ब : स्कॉटलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, इंग्लंड आणि न्यूझीलंड.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.