IPL चं वेळापत्रक अचानक बदललं! 26 एप्रिलचा अहमदाबादमधील सामना चेन्नईला शिफ्ट, तर… नेमकं काय का

GT vs CSK IPL 2026 चे वेळापत्रक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल (IPL)2026 च्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे. अहमदाबादमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील दोन सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदल करण्यात आली आहे.

IPL चं वेळापत्रक अचानक बदललं!

26 एप्रिल 2026 चा सामना पूर्वी हा सामना अहमदाबादमध्ये होणार होता, परंतु आता तो चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. हा दुपारचा सामना असून दुपारी 03:30 वाजता सुरू होईल. तर चेन्नईत होणारा सामना आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी 07:30 वाजता सुरू होईल.

नेमकं काय कारण? BCCI सांगून टाकलं

26 एप्रिल 2026 रोजी अहमदाबाद आणि गुजरातच्या इतर भागांत महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आणि मतदानाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा –

Rohit Sharma Injury : रोहित शर्माच्या हॉस्पिटलमध्ये तपासण्या; आधीच टेन्शनमध्ये असलेल्या मुंबईची चिंता वाढली, पुढचा सामना खेळणार की नाही?

आणखी वाचा

Comments are closed.