आयपीएल 2026 च्या वेळापत्रकात बदल; अहमदाबादमधील निवडणुकांमुळे बीसीसीआयचा मोठा निर्णय
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९व्या हंगामाच्या वेळापत्रकात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बदल जाहीर केला आहे. यानुसार, २६ एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणारा सामना आता २१ मे रोजी खेळवला जाणार आहे. अहमदाबाद आणि गुजरातच्या इतर भागांत २६ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमुळे हा निर्णय घेतल्याचे बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने यापूर्वी जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना २६ एप्रिल रोजी दुपारी ३:३० वाजता अहमदाबादच्या स्टेडियमवर होणार होता. मात्र, नव्या बदलानुसार आता २६ एप्रिल रोजी या दोन्ही संघांमधील सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल, जो भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. तसेच, ‘रिव्हर्स फिक्स्चर’नुसार (परतीचा सामना) आता या दोन्ही संघांमधील हंगामातील दुसरा सामना २१ मे रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी ७:३० वाजता खेळवला जाईल.
Comments are closed.