विराट-रोहितची चर्चा नाहीच, दोन कर्णधारांचा प्रयोग! ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी BCCI कडून टीम इंडियाच
बीसीसीआयने भारताला ऑस्ट्रेलियासाठी एक संघ जाहीर केले: आशिया कप 2025 मध्ये आज भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना रंगणार असतानाच वरिष्ठ निवड समितीने ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. ही मालिका कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवली जाणार असून तीनही सामने याच ठिकाणी होतील.
दोन कर्णधारांचा प्रयोग!
30 सप्टेंबरला मालिकेचा पहिला सामना ग्रीन पार्क येथे खेळला जाईल. दुसरा सामना 3 ऑक्टोबरला तर तिसरा आणि शेवटचा सामना 5 ऑक्टोबरला होणार आहे. सर्व सामने दुपारी 1:30 वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होतील. पहिल्या वनडेत रजत पाटीदार (Rajat Patidar) भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करतील. उर्वरित दोन सामन्यांसाठी तिलक वर्मा (Tilak Varma) कर्णधारपदाची धुरा सांभाळणार असून पाटीदार उपकर्णधाराची भूमिका निभावतील.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेसाठी भारत एक पथक जाहीर केला.
सर्व तपशील 🔽https://t.co/v8qoklo6zr
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 14 सप्टेंबर, 2025
विराट-रोहित संघात नाहीत! (No Virat Kohli Rohit Sharma)
यापूर्वी अशी चर्चा होती की, रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यापूर्वी तयारीसाठी या मालिकेत खेळतील. मात्र जाहीर झालेल्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गजांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आता निश्चित झाले आहे की कानपूरच्या ग्रीन पार्कवर या मालिकेत हे दोघेही मैदानात उतरणार नाहीत.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- पहिली वनडे : 30 सप्टेंबर, कानपूर
- दुसरी वनडे : 3 ऑक्टोबर, कानपूर
- तिसरी वनडे : 5 ऑक्टोबर, कानपूर
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ (India A squad for Australia A series)
रजत पाटिदार (कर्नाधर), प्रभासिमरन सिंग (यश्तार रक्ष), रायन परग, आयुष बडोनी, सूर्यश शेज, विप्रज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंग, युधवीर, रवी बिशत, अरिश पियशिर गा.
दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी भारत अ संघ (India A squad for Australia A series)
तिलक वर्मा (कर्नाधर), रौप्य पाटिद्र (उपदेश), अभिषेक शर्मा, प्रभासिमरन सिंग (यशर रक्ष), रायन परग, आयुश बडोनी, सूर्यश शेज, विप्रज निगम, निशंत सिंधू, गर्जफेट, गर्जफेट (यशरक्षक), अरशित राणा.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.