एका सामन्यात सगळं पणाला! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, कोण IN, कोण O

ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी भारतीय महिला संघ: भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार असून, त्यासाठी बीसीसीआयने संघाची अधिकृत घोषणा केली आहे. बीसीसीआय महिला X (ट्विटर) अकाउंटवरून हा स्क्वाड जाहीर करण्यात आला आहे. हा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध पर्थ येथे 6 ते 9 मार्च 2026 दरम्यान खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा अनुभवी हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे, तर स्टार फलंदाज स्मृती मानधना हिला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

टीम इंडियात दोन विकेटकीपरला संधी

या स्क्वाडमध्ये दोन विकेटकीपर-फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. संघाची प्रमुख विकेटकीपर ऋचा घोष हिला स्थान मिळाले असून, वनडे वर्ल्ड कप 2025 मध्ये खेळलेली उमा छेत्री हिलाही संधी देण्यात आली आहे. याशिवाय, पेस ऑलराउंडर म्हणून अमनजोत कौर हिची निवड करण्यात आली आहे.

दुखापतीनंतर प्रतिका रावलची दमदार पुनरागमन

वनडे वर्ल्ड कप 2025 मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी, मात्र सेमीफायनलपूर्वी दुखापतीमुळे बाहेर पडलेली प्रतिका रावल आता पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे. तिच्या फिटनेसनंतर तिला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

या संघात सियाली सतघरे हिलाही स्थान मिळाले आहे. फिरकी विभागात वैष्णवी शर्मा, स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा अशा तीन प्रमुख स्पिनर्सचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीत क्रांती गौड आणि रेणुका सिंह ठाकूर संघाचा कणा असतील. याशिवाय, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या एकमेव कसोटी सामन्यासाठी शेफाली वर्मा आणि हरलीन देओल यांनाही संधी देण्यात आली आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा योग्य समतोल साधलेला हा संघ ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारताचा संघ (India Womens Squad for Australia Test) –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, अमनजोत कौर, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), प्रतिक रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका सिंह ठाकूर, स्नेह राणा, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, सायली सातघरे.

हे ही वाचा –

VIDEO : पांड्या-कार्तिकचं भर मैदानात कडाक्याचं भांडण, हार्दिक संतापाच्या भरात बोलत राहिला, सगळे प्रेक्षक पाहतच राहिले

आणखी वाचा

Comments are closed.