बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वनडे अन् टी-20 संघ जाहीर, 7 वर्ष

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. आगामी जून 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळेच संघ निवडीत अनेक महत्त्वाचे बदल करत युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.

या संघ निवडीतील सर्वात मोठी बाब म्हणजे भारती फुलमालीचे तब्बल 7 वर्षांनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. भारतीने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 मध्ये खेळला होता. 31 वर्षीय या फलंदाजाने WPL 2026 मध्ये अप्रतिम कामगिरी करत संघ व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेतले. तिने 13 सामन्यांत 162.85 च्या स्ट्राइक रेटने 289 धावा केल्या आहेत. आतापर्यंत तिने केवळ दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात 23 धावा केल्या आहेत. संघ व्यवस्थापनाला भारतीकडून फिनिशरच्या भूमिकेत महत्त्वाची कामगिरी अपेक्षित आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी श्रेयांका पाटीलचाही संघात समावेश करण्यात आला आहे. ती तब्बल 14 महिन्यांच्या दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. मात्र, अलीकडील सामन्यांत चांगली कामगिरी करूनही हरलीन देओलला टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. एकदिवसीय संघात वैष्णवी शर्मा आणि जी कमलिनी यांना प्रथमच राष्ट्रीय संघात संधी देण्यात आली असून, या दोन्ही खेळाडू प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

तसेच कश्वी गौतमचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला असून तिने अरुंधती रेड्डीची जागा घेतली आहे. दरम्यान, स्पिनर राधा यादवला एकदिवसीय आणि टी-20 दोन्ही संघांतून वगळण्यात आले आहे, हा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर अनुभव आणि तरुणाई यांचा समतोल साधत केलेली ही संघनिवड आगामी काळात किती यशस्वी ठरते, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ :

भारताचा T20I संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी कमलिनी (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, भारती फुलमाळी, श्रेयंका पाटील.

भारताचा एकदिवसीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी कमलिनी (यष्टीरक्षक), काशवी गौतम, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल.

हे ही वाचा –

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?

आणखी वाचा

Comments are closed.