BCCI कडून वेळापत्रक जाहीर… IPL सुरूही नाही तोच नवा थरार! टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर, पाहा सं
भारत विरुद्ध आयर्लंड T20 मालिकेचे वेळापत्रक : आयपीएल 2026 संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धडाकेबाज प्रवास सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं होतं, आणि आता जून महिन्यात भारत आयर्लंड दौऱ्यावर जाणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
जूनमध्ये भारताचा आयर्लंड दौरा
भारतीय संघ जून महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार असून, हा भारताचा चौथा आयर्लंड दौरा ठरणार आहे. यापूर्वी भारताने 2018, 2022 आणि 2023 मध्ये आयर्लंडचा दौरा केला होता. विशेष म्हणजे 2007 नंतर प्रथमच भारतीय संघ बेलफास्ट येथे सामने खेळणार आहे.
या मालिकेतील सामने पुढीलप्रमाणे –
26 जून 2026 – पहिला टी-20 (बेलफास्ट)
28 जून 2026 – दुसरा टी-20 (बेलफास्ट)
🚨 बातम्या 🚨
साठी वेळापत्रक जाहीर केले #TeamIndia2️⃣ सामन्यांच्या T20I मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा 👌
तपशील ▶️ https://t.co/txJpSlQ7oi#IREvIND pic.twitter.com/rKYRmzBUU8
— BCCI (@BCCI) 21 मार्च 2026
भारताचा आयर्लंडवर दबदबा
भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 8 टी-20 सामने खेळले गेले आहेत आणि या सर्व सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. म्हणजेच आयर्लंडला अजूनही भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. 2009 मध्ये नॉटिंघम येथे झालेल्या पहिल्या सामन्यातही भारतानेच बाजी मारली होती. दोन्ही संघ शेवटचे 2024 मध्ये न्यूयॉर्क येथे आमनेसामने आले होते, तेव्हाही भारताने 8 विकेट्सने सहज विजय मिळवला होता.
आयपीएलनंतर टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक
आयपीएल 2026 संपल्यानंतर भारतीय संघाचा कार्यक्रम खूपच तगडा असणार आहे. आयर्लंड दौऱ्यापूर्वी भारत अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर भारत पाच टी-20 आणि तीन वनडे सामने खेळेल. ही मालिका 1 जुलै ते 19 जुलै दरम्यान होणार आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.