आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

बीसीसीआयने एशिया चषक 2025 साठी टीम इंडिया पथकाची घोषणा केली: 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाचा संघ जाहीर केला. यंदाचा आशिया कप टी-20 स्वरूपात रंगणार असून टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या कर्णधार शुभमन गिलला पण संघात स्थान मिळालेले आहे. तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना जागा मिळाली आहे.

आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ –

सूर्यकुमार यादव (कर्नाधर), शुबमन गिल (उपमत), अभिषेक शर्मा, टिळ वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, रुन चक्रबोर्ट, सॅनसू,

पहिल्यांदाच आशिया कपमध्ये 8 संघ होणार सहभागी

2025 चा आशिया कप 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान अबू धाबी आणि दुबई येथे खेळला जाईल. यावेळी आशिया कप टी-20 स्वरूपात असेल. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच आठ संघांचा समावेश करण्यात आला आहे. या आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. आधी लीग स्टेज सामने खेळवले जातील, ज्यामध्ये प्रत्येक संघ 3 सामने खेळेल. त्यानंतर सुपर-4 फेरी होईल. यातील अव्वल संघांमध्ये 28 सप्टेंबर रोजी विजेतेपदाचा सामना खेळला जाईल.

आशिया कपमध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक

भारतीय संघाला आशिया कपच्या गट अ मध्ये पाकिस्तान, ओमान आणि युएईसह स्थान देण्यात आले आहे. तर गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये युएई विरुद्ध खेळेल. त्यानंतर त्यांचा पुढचा सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये पाकिस्तान विरुद्ध होईल. भारतीय संघ आपला शेवटचा गट सामना 19 सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये ओमान विरुद्ध खेळेल. आशिया कप दोन्ही गटातील टॉप-2 संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. त्यानंतर सुपर-4 टप्प्यातील टॉप 2 संघांमध्ये जेतेपदाचा सामना खेळवला जाईल.

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना

20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना

हे ही वाचा –

Ruturaj Gaikwad : ‘हा’ आहे मराठमोळ्या ऋतुराजचा दुसरा अवतार! फक्त फलंदाजी नाही, आता गोलंदाजीतही कमाल, पाहा विकेटचा भन्नाट VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.