श्रेयस अय्यर IN, तिलक वर्मा OUT; टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने बदलला भारतीय संघ! सुंदरची धक्कादाय

न्यूझीलंड T20I साठी भारताचा अद्ययावत संघ : बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात महत्त्वाचे बदल केले आहेत. बराच काळ संघाबाहेर असलेले श्रेयस अय्यर आणि रवि बिश्नोई यांची टी-20 संघात पुन्हा एकदा निवड झाली आहे. मात्र, वनडे मालिकेदरम्यान दुखापत झालेल्या अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यांच्यासाठी ही बातमी धक्कादायक ठरली असून, तो संपूर्ण पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका 21 ते 31 जानेवारी या कालावधीत खेळवली जाणार आहे. (India Updated Squad For New Zealand T20I)

श्रेयस अय्यरला पहिल्या तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले असून, त्याची निवड तिलक वर्मा यांच्या रिप्लेसमेंट म्हणून करण्यात आली आहे. तिलक वर्मा चौथ्या टी-20 सामन्यापासून संघात पुनरागमन करू शकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदर यांच्या जागी रवि बिश्नोई यांना संघात संधी देण्यात आली आहे.

तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना झालेल्या दुखापती टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. कारण, 2026 टी-20 विश्वचषक सुरू होण्यासाठी आता एक वर्षाहूनही कमी कालावधी उरला आहे. श्रेयस अय्यर तब्बल डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदाच टी-20 संघात परतले आहेत. त्यांनी शेवटचा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. दरम्यान, आयपीएल 2025 मध्ये श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी करत 604 धावा केल्या होत्या. संपूर्ण हंगामात त्यांचा स्ट्राइक रेट 175 इतका आक्रमक राहिला. तर दुसरीकडे, रवि बिश्नोई यांनी भारतासाठी शेवटचा टी-20 सामना जानेवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. आतापर्यंत त्यांनी 42 टी-20 सामन्यांत 61 बळी घेतले आहेत.

भारताचा अपडेट टी-20 संघ (India Updated Squad For New Zealand T20I ) : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (पहिले तीन टी-20), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.

हे ही वाचा –

Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

आणखी वाचा

Comments are closed.