चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा तीनपट जास्त रक्कम
बीसीसीआय कॅश प्राइज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत (Champions Trophy 2025) जेतेपद पटकावलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्या अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत केले. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला आयसीसीने 19.50 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने देखील भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पेटारा उघडला आहे.
बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने 58 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ही रक्कम खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही दिली जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर आयसीसीकडून मिळणाऱ्या रक्कमेपेक्षा तीनपट जास्त रक्कमेचं बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे.
🚨 बातम्या 🚨
बीसीसीआयने भारताच्या विजयी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पंजेन्टसाठी रोख बक्षीस जाहीर केले.
तपशील 🔽 #Teamindia | #चॅम्पियन्सस्ट्रॉफी https://t.co/si5v9rffgx
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 20 मार्च, 2025
बीसीसीआयने काय म्हटलंय?
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी 58 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही बक्षीस रक्कम खेळाडू तसेच प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी, निवड समितीच्या सदस्यांना दिली जाईल.
भारत आणि न्यूझीलंडचा अंतिम सामना कसा राहिला?
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यानंतर, त्याने अंतिम सामन्यातही शानदार कामगिरी केली आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 251 धावा केल्या. यादरम्यान, डॅरिल मिशेलने 63 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात, भारताने 49 षटकांत लक्ष्य गाठले. रोहितने अंतिम सामन्यात 76 धावांची शानदार खेळी केली. श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले.
आपण सर्व चाहत्यांना ज्यांनी आम्हाला समर्थन दिले 🤝🏻
ज्या संघाला आम्हाला हसू आले ते 🇮🇳
दुबई 2025 खरोखर संस्मरणीय आहे 🫶🏻🏆
ते एक लपेटणे आहे 🎬
पहा 🎥🔽 #Teamindia | #चॅम्पियन्सस्ट्रॉफी
– बीसीसीआय (@बीसीसीआय) मार्च 13, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत कोणाला किती रुपये मिळणार?
विजेता – 19.5 कोटी रुपये (भारत)
उपविजेता – 9.75 कोटी रुपये (न्यूझीलंड)
उपांत्य फेरी (पराभूत झालेला संघ) – प्रत्येकी 4.85 कोटी रुपये
पाचवे/सहावे स्थान – 3 कोटी रुपये
7वे/8वे स्थान – 1.2 कोटी रुपये
https://www.youtube.com/watch?v=SDUQVGMVJzy
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.