गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार नाही; BCCI ने टीकाकारांना फटकारलं

टेम्बा बवुमाच्या दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 2-0 अशा फरकाने कसोटी मालिकेत दारून पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर देशभरातून टीका केली जात आहे. गंभीरच्या कार्यकाळात हिंदुस्थानने 18 कसोटींपैकी 10 सामने गमावले आहेत. त्यामुळे गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, BCCI ने या सर्व प्रकरणावर पडदा टाकत गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक पदावरून पायउतार होणार नसल्यांच स्पष्ट केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेने तब्बल 25 वर्षांनी हिंदुस्थानात कसोटी मालिका विजयाचा आनंद साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचा हा मालिका विजय गौतम गंभीर यांच्या अडचणींमध्ये वाढ करणारा ठरला आहे. त्यामुळे सोशल मीडियासह सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. गौतम गंभीरच्या जागी व्ही.व्ही.एस लक्ष्मण टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकप पदाच्या शर्यतीत, असल्याचा दावाही अनेकांनी केला. मात्र, BCCI ने सर्वांना फटकारत गौतम गंभीरवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, गौतम गंभीरवर पूर्ण विश्वास ठेवत त्याला संघाची पुनर्बांधणी करण्यासाठी पाठिंबा दिला जाईल, असे BCCI ने म्हणले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका पार पडल्यानंतर संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांमध्ये बैठक होणार आहे. तसेच गौतम गंभीरचा करार 2027 च्या वर्ल्ड कप पर्यंत असल्याचं सुद्ध BCCI ने म्हटलं आहे.

Comments are closed.