बीसीसीआयचा खेळाडूंना दणका; पहा आयपीएलसाठी लागू केलेल्या सर्व नवीन नियमांची संपूर्ण यादी!

BCCI ने आयपीएल २०२६ (IPL 2026) पूर्वी खेळाडू आणि संघांसाठी काही नवीन आणि कडक नियम लागू केले आहेत. सरावापासून ते क्रिकेटपटूंच्या कुटुंबातील सदस्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. ऑरेंज आणि पर्पल कॅपबाबतही नवीन नियम आला आहे, तर पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनमध्ये आता खेळाडू स्लिव्हलेस जर्सी (Sleeveless Jersey) घालून येऊ शकणार नाहीत.

​येथे त्या सर्व नियमांची यादी आहे, जी आयपीएल २०२६ वर लागू होईल:

ओपन नेट प्रॅक्टिसवर बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक संघाला सरावासाठी २ नेट्स दिले जातील. जर एका संघाने आपला सराव लवकर संपवला, तर दुसरा संघ त्यांच्या नेट्सचा वापर करू शकणार नाही. सराव (Practice) असलेल्या दिवशी खेळाडूंना संघाच्या बसनेच मैदानावर येणे अनिवार्य असेल.

सरावादरम्यान खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना ड्रेसिंग रूमपर्यंत येण्याची परवानगी नसेल. ड्रेसिंग रूममध्ये केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळेल. कुटुंबातील सदस्य हवे असल्यास स्वतःच्या स्वतंत्र वाहनाने मैदानावर येऊ शकतात आणि त्यांना ‘हॉस्पिटेलिटी एरिया’मध्ये बसावे लागेल. खेळाडूंना LED बोर्ड्सच्या दिशेने चेंडू न मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच LED बोर्ड्ससमोर बसण्यासही मनाई असेल.

ज्या खेळाडूकडे ‘ऑरेंज कॅप’ किंवा ‘पर्पल कॅप’ असेल, त्याला ती कॅप सुरुवातीला किमान २ षटकांपर्यंत (Overs) घालणे अनिवार्य असेल. पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनमध्ये फ्लॉपी कॅप, स्लिव्हलेस जर्सी आणि चपलांवर बंदी घालण्यात आली आहे. सामन्याच्या दिवशी ‘मेन स्क्वेअर’वर (मुख्य खेळपट्टीच्या भागात) कोणतीही फिटनेस टेस्ट घेतली जाणार नाही.

नियम मोडल्यास प्रथम चेतावणी दिली जाईल, त्यानंतर शिक्षेची तरतूद असेल. सामन्याच्या दिवसासाठी नवीन प्रोटोकॉल लागू झाला आहे. डॉक्टरसह केवळ 12 सपोर्ट स्टाफ सोबत असावेत आणि प्रत्येक स्टाफ मेंबरकडे ‘ॲक्रिडिटेशन कार्ड’ असणे अनिवार्य आहे. जर एखाद्या खेळाडूला आपला जर्सी नंबर बदलायचा असेलतर त्याबाबतची माहिती २४ तास

Comments are closed.