BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? वैभव सूर्यवंशी कर्णधार
नवी दिल्ली : बीसीसीआयच्या ज्युनिअर क्रिकेट कमिटीनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या अंडर-19 टीमची घोषणा केली आहे. भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेत 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेसाठी 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला भारताचा कॅप्टन करण्यात आलं आहे. ज्युनिअर क्रिकेट कमिटीनं 2026 च्या अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. आयसीसी पुरुष अंडर 19 वर्ल्ड कप 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 मध्ये झिम्बॉब्वे आणि नामिबियात आयोजित करण्यात आला आहे. या वर्ल्ड कपसाठी भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे असेल.
आयुष म्हात्रे दुखापतग्रस्त असल्यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला कर्णधार करण्यात आलं आहे. वैभव सूर्यवंशी पहिल्यांदा भारताचं नेतृत्त्व करेल. आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा दुखापतग्रस्त असल्यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळणार नाहीत. ते उपचारासाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल होतील. त्यानंतर वर्ल्ड कपसाठी रवाना होतील.
भारताचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन वनडे सामने वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्त्वात खेळेल. पहिली वनडे 3 जानेवारी, दुसरी वनडे 5 जानेवारी आणि तिसरी वनडे 7 जानेवारीला होणार आहे. सर्व मॅचेस विलोमूर पार्कमध्ये होणार आहेत.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा संघ : वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उधव मोहन, युवराज गोहिल आणि राहुल कुमार
ICC 2026 अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारताची टीम- आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग आणि उधव मोहन.
आणखी वाचा
Comments are closed.