क्रिकेटपटूंनी 35 लाखांची केळी खाल्ली, BCCI ला हायकोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय?
बीसीसीआयसाठी केळी घोटाळा : आशिया कप 2025 वर सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 9 सप्टेंबरपासून आठ संघांमध्ये या स्पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आज म्हणजेच 10 सप्टेंबरला टीम इंडिया पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. पण यादरम्यान एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला नोटीस बजावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्यात लाखो रुपये केवळ केळ्यांवर खर्च केल्याचा आरोप आहे. हा नेमका घोटाळा काय आहे? तो चर्चेत कसा आला? आणि त्याचे धागेदोरे बीसीसीआयशी कसे जोडले गेले? हे जाणून घेऊया…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला उत्तराखंड उच्च न्यायालयाने तब्बल 12 कोटी रुपयांच्या गैरवापराच्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाल्याचे उघड झाले आहे आणि याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, या 12 कोटींपैकी तब्बल 35 लाख रुपये केवळ खेळाडूंसाठी केळी खरेदी करण्यावर खर्च करण्यात आल्याचे ऑडिट अहवालात नमूद आहे. याशिवाय खेळाडूंना फळे देण्याच्या नावाखाली आणि इतर बाबींमध्येही प्रचंड रकमेचा उधळपट्टीत वापर झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
केळ्यांवर खर्चले 35 लाख रुपये?
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, उत्तराखंड उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, 12 कोटींपैकी तब्बल 35 लाख रुपये केवळ केळी खरेदीसाठी खर्च करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार असून, बीसीसीआयलाही यावर आपले उत्तर द्यावे लागणार आहे.
उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या ऑडिट अहवालानुसार, इव्हेंट मॅनेजमेंटसाठी तब्बल 6.4 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच टूर्नामेंट व ट्रायल्सवर एकूण 26.3 कोटी रुपये उधळले गेले, जे मागील आर्थिक वर्षाच्या 22.3 कोटी रुपयांच्या तुलनेत जास्त आहेत. याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, उत्तराखंड असोसिएशनने खाण्यापिण्याच्या खर्चाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे.
उत्तराखंड क्रिकेट बोर्डचे वाद
उत्तराखंड क्रिकेट बोर्डावर याआधीही गंभीर गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. 2022 मध्ये उघड झाले होते की, खेळाडूंना 12 महिन्यांच्या काळात सरासरी दररोज केवळ 100 रुपये दिले जात होते, जे राज्यातील किमान वेतनापेक्षाही कमी आहे. एवढेच नव्हे, तर उत्तराखंड संघातील खेळाडूंनी मानसिक आणि शारीरिक शोषणाचेही आरोप केले होते. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येही प्रचंड गैरव्यवहार केला होता.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.