बीसीसीआय IPL च्या वेळापत्रकाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता, अपडेट समोर

आयपीएल 2026 नवी दिल्ली : भारतात सध्या टी 20 वर्ल्ड कप सुरु आहे. सुपर 8 चे सामने सध्या सुरु असून उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला वर्ल्ड चॅम्पियनला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. याच दरम्यान पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल संदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयकडून आयपीएलचं वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर केलं जाऊ शकतं, असं सांगण्यात. पश्चिम बंगाल सह 3 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळं बीसीसीआय दोन टप्प्यात आयपीएलचं वेळापत्रक जाहीर करु शकते. आयपीएल 26 मार्चला सुरु होणार असून  31 मे रोजी संपणार आहे.

यंदा पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आसाम या राज्यांमध्ये विधानसभा निवडमूक होणार आहे. या तीन राज्यातील निवडणुकांमुळं बीसीसीआय आयपीएलचं वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर करु शकतं.  पहिल्या टप्प्यात दोन ते तीन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, अशी शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील आयपीएलचे सामने ज्या राज्यात निवडणूक नाही, अशा राज्यांमध्ये होतील. जेव्हा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील तेव्हा बीसीसीआय उर्वरित वेळापत्रक जाहीर करेल.

बीसीसीआय जेव्हा आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करेल तेव्हा पहिल्या टप्प्यात 20-25  सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. तर,फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं जाऊ शकतं. तर, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आयपीएलचं दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं जाऊ शकतं.

निवडणुकीमुळं राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दलावर मोठी जबाबदारी असते. पश्चिम  बंगालमध्ये ईडन गार्डन्स आणि चिदंबरम स्टेडियम म्हणजेच तामिळनाडू येथील मैदानांवर सुरक्षा पुरवण्यात पोलिसांना अडचणी येऊ शकतात. राजस्थान रॉयल्सचे काही सामने देखील गुवाहाटीत होणार आहेत. त्यामुळं तिथं देखील हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं निवडणुका ज्या राज्यात आहेत, तिथं सामने आयोजित करणं बीसीसीआयकडून निवडणूक होईपर्यंत टाळलं जाऊ शकतं.

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर काही समस्या निर्माण झाल्यास तिथले सामने गुवाहाटीच्या बारासपारा स्टेडियममध्ये खेळवले जातात. मात्र, यावेळी आसाममध्ये देखील निवडणूक आहे. याशिवाय टी 20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे. त्यानंतर पिच पुन्हा तयार करण्यासाठी, मैदानं सज्ज करण्यासाठी कावी वेळ सपोर्ट स्टाफला लागू शकतो. गेल्या वर्षी आरसीबीनं विजेतेपद मिळवलेलं, यावर्षी कोण विजेतेपद मिळवणार ते पाहावं लागेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.