‘सरपंच’ अय्यरला अद्दल घडली; मैदानातल्या एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं, BCCI चा मोठा निर्णय

श्रेयस अय्यरला ₹12 लाखांचा दंड IPL 2026 PBKS vs GT : श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने आयपीएल 2026 (IPL 2026) मधील आपला पहिला सामना जिंकत दमदार सुरुवात केली. गुजरात टायटन्सविरुद्धचा हा सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला आणि पंजाबने थरारक विजय मिळवला. मात्र, या विजयाच्या आनंदावर लगेचच पाणी फिरले, कारण बीसीसीआयने कर्णधार श्रेयस अय्यरवर कारवाई केली आहे. चला, हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.

अर्शदीप सिंगने 11 चेंडूंचे षटक टाकले अन्….

पंजाब किंग्सने या आयपीएल हंगामातील आपला पहिला सामना जिंकला, पण संघाच्या गोलंदाजीला बराच वेळ लागला. विशेषतः, अर्शदीप सिंगने टाकलेले डावाचे शेवटचे षटक कधीही न संपणारे वाटत होते. साधारणपणे एका षटकात सहा चेंडू असतात, पण अर्शदीप सिंगने तब्बल 11 चेंडूंचे षटक टाकले. अर्शदीपच्या षटकातील शेवटचा चेंडूही पंचांनी वाईड घोषित केला होता, पण कर्णधाराने डीआरएस घेतला आणि नंतर तो चेंडू वैध असल्याचे समजले, त्यामुळे ते षटक 12 चेंडूंचे झाले नाही, अन्यथा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला असता.

आयपीएलमध्ये एकूण सहा वेळा असे घडले आहे की, एका षटकात 11 चेंडू टाकले गेले आहेत. मोहम्मद सिराज, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, संदीप शर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी असे केले आहे. आता अर्शदीपनेही या यादीत स्थान मिळवले आहे. पण, याचा परिणाम श्रेयस अय्यरवर झाला आहे. बीसीसीआयने षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल श्रेयस अय्यरला दंड ठोठावला आहे. श्रेयस अय्यरला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे समजले आहे, ज्यामुळे तो यावर्षी अशा कारवाईची शिक्षा झालेला पहिला कर्णधार ठरला आहे.

BCCI ने घेतला सर्वात मोठा निर्णय

बीसीसीआयने जाहीर केले की, न्यू चंदीगड येथील न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या आयपीएल 2026 च्या सामन्यादरम्यान षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, जे किमान षटकांच्या वेगाच्या उल्लंघनाशी संबंधित आहे, या हंगामातील त्याच्या संघाचे हे पहिलेच उल्लंघन असल्याने अय्यरला 1.2 दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

हे ही वाचा –

Mohammed Shami: फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला ‘ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी…’

आणखी वाचा

Comments are closed.