BCCI चा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या सामन्यापूर्वी गायक झुबिन गर्ग यांना श्रद्धांजली, मैदानात तब
झुबिन गर्ग विश्वचषक उद्घाटन सोहळ्यास बीसीसीआय श्रद्धांजली: लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांच्या अचानक झालेल्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना 19 सप्टेंबर रोजी गायकाचा मृत्यू झाला. ते फक्त 52 वर्षांचे होते. झुबिन यांचे आसामी संगीत जगतात मोठं योगदान आहे. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते अजून सावरलेले नाहीत. रविवारी 21 सप्टेंबर रोजी झुबिन गर्ग यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी भारतात आणण्यात आलं. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या उद्घाटन सामन्यापूर्वी यांना श्रद्धांजली वाहणार आहे. यादरम्यान, मैदानात तब्बल 40 मिनिटं त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.
बीसीसीआय झुबिन गर्ग यांना श्रद्धांजली वाहणार
बीसीसीआयचे सरचिटणीस देवजित सैकिया यांनी अलीकडेच हे जाहीर केले. सैकिया म्हणाले की, गर्ग यांच्या निधनानंतर आसाममध्ये तीव्र शोककळा पसरली आहे, त्यामुळे हा समारंभ वर्ल्ड कप उद्घाटन समारंभाचा भाग असेल. ही श्रद्धांजली गर्ग यांच्या प्रतिष्ठित प्रतिष्ठेचा आणि त्यांनी वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रमातून निर्माण केलेल्या वारशाचा सन्मान करेल. क्रिकेट समुदायाने भारतीय संगीतकाराला दिलेला हा सर्वोच्च सन्मान मानला जातो.
#वॉच | मुंबई: बीसीसीआयचे सचिव देवजित सायकिया म्हणतात, “… अलीकडेच, आसामचे संगीत चिन्ह, झुबिन गंग यांचे निधन झाले. आज, त्याचे मर्त्य अवशेष गुवाहाटी येथे आले आहेत आणि ते सार्वजनिक श्रद्धांजलीसाठी 1-2 दिवस ठेवले जातील. आसाममध्ये मोठ्या प्रमाणात शोक आहे. म्हणून, आसाममध्ये मोठ्या प्रमाणात दु: ख आहे. म्हणून, कन्व्हेनन्स ठेवून… pic.twitter.com/llbmjva7ym
– वर्षे (@अनी) 21 सप्टेंबर, 2025
देवजीत सैकिया यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, “झुबिन यांच्या निधनानंतर आसाममध्ये अत्यंत शोकाकुल आणि दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. त्या परिस्थितीचा विचार करून आणि एक सन्मानास पात्र व्यक्ती म्हणून आसाम क्रिकेट असोसिएशन व बीसीसीआय यांच्या वतीने उद्घाटन सोहळ्यात विशेष श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम झुबिन यांना अर्पण केलेली आमची आदरांजली असेल. क्रिकेटविश्वाकडून दिली जाणारी ही सर्वात मोठी श्रद्धांजली ठरेल. जवळपास 40 मिनिटांचा हा कार्यक्रम पूर्णपणे झुबिन यांच्या आठवणींना समर्पित असेल.”
30 सप्टेंबरला रंगणार पहिला सामना
महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. हा प्रतिष्ठेचा स्पर्धा 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपमधील पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्या महिला संघांमध्ये रंगणार असून, या सामन्यापूर्वीच दिवंगत गायक झुबिन गर्ग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.