विकृताकडून ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा विनयभंग, देशाची मान खालावणाऱ्या घटनेवर BCCI म्हणाली…
महिला विश्वचषक २०२५ : महिला वनडे वर्ल्ड कप 2025च्या उपांत्य फेरीत स्थान मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला संघासोबत इंदूरमध्ये एक अत्यंत लज्जास्पद घटना घडली. गुरुवार, 23 ऑक्टोबरच्या सकाळी ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला खेळाडूंशी एका व्यक्तीने छेडछाड केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आता प्रतिक्रिया दिली असून या घटनेला देशासाठी लाजिरवाणी म्हटले आहे. तसेच बोर्डाने सुरक्षा प्रोटोकॉलचे पुनरावलोकन करून गरज पडल्यास अधिक कडक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
BCCI नेमकं काय म्हणालं?
इंदूरमधील ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंवरील छेडछाड प्रकरणावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, “ही घटना जितकी निंदनीय आहे, तितकीच दुर्दैवीही आहे. अशा घटना अजिबात घडू नयेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला पकडले.” दरम्यान, बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांच्या माध्यमातून बीसीसीआयने एक अधिकृत निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून ते सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेतील.
सैकिया यांनी निवेदनात म्हटले आहे, “ही अत्यंत दुर्दैवी परंतु एकाकी घटना आहे. भारत नेहमीच आपल्या पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी ओळखला जातो. अशा घटनांना अजिबात सहन केले जाणार नाही. पोलिसांनी लवकर कारवाई केली, त्यांचे आम्ही कौतुक करतो. कायदा दोषींना शिक्षा देईलच. त्याचबरोबर सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेऊन गरज वाटल्यास ती आणखी कडक करू.”
इंदूरमधील ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंबद्दल झालेल्या घटनेचा निषेध करणारे बीसीसीआयचे मानद सचिव देवजित सैकिया यांचे अधिकृत विधान
“ही एक अत्यंत खेदजनक आणि अलिप्त घटना आहे. भारत नेहमीच सर्व पाहुण्यांचा प्रेमळपणा, आदरातिथ्य आणि काळजी यासाठी ओळखला जातो. आम्ही…
— BCCI (@BCCI) 25 ऑक्टोबर 2025
ही घटना कधी घडलं?
ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू हॉटेल रॅडिसन ब्लूमधून एका कॅफेकडे चालत जात होत्या. त्या दरम्यान एक व्यक्ती पांढरा शर्ट आणि काळी कॅप घालून बाईकवर त्यांच्या मागे लागला. संधी मिळताच त्याने एका खेळाडूशी अश्लील वर्तन केले आणि घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे दोन्ही खेळाडू घाबरल्या आणि त्यांनी त्वरित आपल्या सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांना लोकेशन आणि आपत्कालीन मेसेज पाठवला. सिमन्स यांनी सांगितले, “मी त्यांचा मेसेज वाचत असतानाच एका खेळाडूचा फोन आला. ती रडत होती आणि म्हणाली की, कोणीतरी आमच्याशी छेडछाड केली. मी लगेचच कार पाठवून त्यांना हॉटेलमध्ये परत आणले.” त्यानंतर सिमन्स यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवर एमआयजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख खजराना येथील अकील खान अशी पटली. पोलिसांनी 24 ऑक्टोबर रोजी त्याला आजाद नगर परिसरातून अटक केली.
हे ही वाचा –
Shreyas Iyer Injury : मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये, श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना बसला जबरदस्त मार, BCCI ने दिली माहिती, किती दिवस मैदानातून बाहेर?
आणखी वाचा
Comments are closed.