वैभव सूर्यवंशीला तातडीने लंडनला पाठवा; इंग्लंडच्या खेळाडूची बीसीसीआयकडे मागणी, नेमकं कारण काय?
वैभव सूर्यवंशी IPL 2026 RR वि CSK : 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मधील आपल्या पहिल्याच सामन्यात वादळी कामगिरी केली. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावत 52 धावांची तुफानी खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या जबरदस्त कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. इतकेच नाही, तर त्याला थेट सीनियर भारतीय संघात संधी द्यावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
मोहम्मद कैफनंतर आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) यानेही बीसीसीआयकडे सूर्यवंशीला संधी देण्याची मागणी केली आहे. त्याच्या मते, आयपीएलनंतर भारताचा इंग्लंड दौरा होणार असून या युवा खेळाडूला त्या दौऱ्यावर घेऊन जाणे गरजेचे आहे. “तो लगेच प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला नाही तरी चालेल, पण भारतीय संघाच्या वातावरणाचा अनुभव त्याला मिळणं महत्त्वाचं आहे,” असं वॉनने सांगितलं.
दुसऱ्या बाजूला यशस्वी जैस्वाल याचाही उल्लेख करत वॉनने तुलना केली. जैस्वाल शांत आणि संयमी खेळ करत होता, तर सूर्यवंशी पूर्णपणे आक्रमक मूडमध्ये होता. “जैस्वाल चेंडू समजून खेळत होता, पण सूर्यवंशी फक्त चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्यासाठीच खेळत होता. त्याच्या खेळात एक विलक्षण निर्भयता आणि मोकळेपणा दिसतो,” असं वॉन म्हणाला.
जैस्वालनेही आपल्या कारकिर्दीत लहान वयात मोठी कामगिरी केली होती. अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने 175 धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर डोमेस्टिक क्रिकेट आणि इंडिया ‘A’ संघातून सातत्याने चांगली कामगिरी करत तो आज भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
वैभव सूर्यवंशीबाबत आता उत्सुकता आणखी वाढली आहे. आयसीसीच्या नियमानुसार 15 वर्षांचा असल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत तो भारतीय संघाच्या जर्सीत दिसणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.