भारताचा विजेता कर्णधार कायमचा OUT! सूर्यावर BCCIची मोठी कारवाई, कर्णधारपद गेले, संघातूनही बाहेर

सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर भारताचा नवा T20I कर्णधार : भारतीय संघाला आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जिंकून दिल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर टी-20 संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचे नाव आघाडीवर होते. मात्र राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनले आणि त्यांनी पहिलाच मोठा निर्णय घेत सूर्यकुमार यादवच्या हाती टी-20 संघाची धुरा सोपवली. त्यामुळे हार्दिक पंड्याला डावलण्यात आले. जुलै 2024 मध्ये सूर्यकुमार यादव भारताचा पूर्णवेळ टी-20 कर्णधार बनला. विशेष म्हणजे, भारताला विश्वचषक जिंकवून देणारा हा खेळाडू अवघ्या 22 महिन्यांत कर्णधारपदासह संघातील स्थानही गमावेल, अशी कुणालाही अपेक्षा नव्हती.

22 महिन्यांत सूर्याचा गेम ओव्हर… (Suryakumar Yadav Dropped From India T20 Team)

बीसीसीआयने 6 जून रोजी श्रेयस अय्यरची भारताच्या टी-20 संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषणा केली. खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादवला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 क्रिकेटमध्ये नवे विक्रम प्रस्थापित केले. द्विपक्षीय मालिका असो किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धा, भारतीय संघाने सातत्याने यश मिळवले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग नऊ मालिका आणि स्पर्धा जिंकल्या. हा विजयी रथ टी-20 विश्वचषक2026 पर्यंत अविरत सुरू राहिला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताचा विजयाचा टक्का 80.76 इतका राहिला, जो पूर्ण सदस्य देशांच्या कर्णधारांमध्ये सर्वोच्च मानला जातो.

सूर्या बाहेर… अजित आगरकर काय म्हणाले? (Ajit agarkar On Suryakumar Yadav)

कर्णधार म्हणून यशस्वी ठरलेल्या सूर्यकुमार यादवची वैयक्तिक फलंदाजी मात्र सातत्याने घसरत गेली. मनगटाच्या दुखापतीच्या समस्येमुळे गेल्या 18 महिन्यांत त्याची बॅट शांत राहिली. त्यावर अजित आगरकर म्हणाले की, “सूर्याबाबत हा निर्णय खरोखरच कठीण होता. नुकताच आपण विश्वचषक जिंकला आहे, पण प्रत्येक विश्वचषकानंतर संघाच्या पुढील वाटचालीचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा घ्यावा लागतो. सूर्यकुमार यादवचा वैयक्तिक फॉर्म हा एक मुद्दा होता, पण त्याचबरोबर पुढील दोन वर्षांचा, किंबहुना पुढील विश्वचषकापर्यंतच्या कालावधीचा विचार करून आम्हाला हा निर्णय योग्य वाटला. मी आधीही म्हटल्याप्रमाणे, श्रेयस अय्यर कर्णधारपदासाठी पूर्णपणे पात्र आणि योग्य निवड आहे.”

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ (INDIA SQUAD FOR IRELAND SERIES)

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ (INDIA SQUAD FOR England SERIES)

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

आशियाई क्रीडा स्पर्धासाठी भारतीय टी-20 संघ (India Squad for the Asian Games)

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह.

हे ही वाचा –

India Squad for Asian Games 2026 : टीम इंडियामधून 11 खेळाडू OUT, बीसीसीआयने भाकरी नव्हे अख्खा तवाच फिरवला! एशियन गेम्ससाठी संघ जाहीर; पाहा चक्रावणारा Squad

Comments are closed.