ट्रॉफी पळून जाणाऱ्या मोहसीन नक्वीला बांगलादेशची साथ; भारताच्या बाजूने कोण?, BCCI सर्वांत मोठ्या


मोहसिन नकवी एशिया कप ट्रॉफी वाद: आशिया कप 2025 दरम्यान पेटलेला वाद अजूनही शांत होण्याचं नाव घेत नाहीये. आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर थेट कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. अहवालांनुसार, बीसीसीआयच् (BCCI )या दबावामुळे मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांची एसीसी अध्यक्षपदाची खुर्ची जाऊ होऊ शकते. आशिया कप 2025 ची ट्रॉफी स्वतःकडे ठेवून भारतीय संघाला न देण्यामुळे नक्वीवर सतत टीका होतं आहेत.

अजूनही पेटलेला ट्रॉफी वाद

आशिया कप ट्रॉफीचा वाद अजूनही सुरूच आहे. वृत्तांनुसार, BCCI आता मोहसिन नकवी यांना एसीसी अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी करत आहे. हे तेव्हाचं प्रकरण आहे जेव्हा नक्वी यांनी आशिया कपची ट्रॉफी भारतीय संघाला न देता स्वतःकडेच ठेवली. अलीकडेच झालेल्या एसीसी बैठकीत बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ट्रॉफी थेट भारताला देण्याची मागणी केली होती. मात्र, नक्वी यांनी हा मुद्दा अधिकृत अजेंड्यावर नसल्याचं सांगत नकार दिला.

मोहसीन नक्वीला बांगलादेशची साथ; भारताच्या बाजूने कोण?

पाकिस्तानी माध्यमांच्या मते, बीसीसीआय आता मोहसीन नक्वी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी सदस्य देशांचा पाठिंबा मिळवण्याच्या हालचाली करत आहे. श्रीलंकेने भारताला साथ देण्याची तयारी दाखवली असून बांगलादेश पाकिस्तानच्या बाजूने उभा आहे. अफगाणिस्तानची भूमिका निर्णायक ठरू शकते, त्यामुळे परिस्थिती कोणत्या दिशेने वळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय आहे? (Mohsin Naqvi Runs Away With Asia Cup Trophy)

झाले असे की, आशिया कपचा अंतिम सामना झाल्यानंतर ट्रॉफीवरुन मैदानात जोरदार राडा झाला. एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्याच्या हस्ते आशिया कपमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या संघाला ट्रॉफी दिली जाणार होती. मात्र भारतीय संघाने मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर साधारण 70-80 मिनिटं नाट्यमय गदारोळ झाला. भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. त्यानंतर मोहसीन नक्वी आशिया कपची ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची मेडल्स घेऊन मैदानातून (Asia Cup Trophy Controversy) निघून गेला.

हे ही वाचा –

Abhishek Sharma sister wedding: सजावटीला परदेशातून दोन ट्रक फुलं आणली, 10-12 सोडाच, तब्बल किती लाखांचा फक्त लेहेंगा? टीम इंडियाचा राॅकस्टार अभिषेक शर्माच्या बहिणीच्या लग्नाची चर्चा!

आणखी वाचा

Comments are closed.