बुमराह बाहेर… रोहित सलामीवीर! टीम इंडियात होणार मोठे उलटफेर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिके


टीम इंडियाचा संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय आणि टी-20 मालिका: भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर 30 नोव्हेंबर 2025 पासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. मात्र या मालिकेआधीच टीम इंडिया सतत वाढत जाणाऱ्या दुखापतींच्या समस्येत सापडली आहे. उपकर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ऑस्ट्रेलियात दुखापत झाल्यानंतर आधीच बाहेर आहे, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यातच आता कर्णधार शुभमन गिलच्या (Shubman Gill to miss ODI series against South Africa) बाबतही मोठी अपडेट आली आहे. तोही वनडे मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांची नावं कर्णधारपदासाठी पुढे येत आहेत.

गिल मालिकेबाहेर? पंतकडे कर्णधारपद देण्याचा विचार

पीटीआयच्या ताज्या अहवालानुसार, शुभमन गिलला मानदुखीची समस्या असल्याने तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका खेळणार नाहीत. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत वनडे संघात परतण्यासाठी तयार आहेत आणि त्याला कर्णधारपद दिले जाऊ शकते. केएल राहुलही कर्णधारपदाचा पर्याय असून, पंत कर्णधार झाल्यास राहुल उपकर्णधार होऊ शकतो.

टीम मॅनेजमेंट शुभमन गिलबाबत कोणताही धोका घ्यायच्या मूडमध्ये नाही आणि त्याला पूर्ण विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. गिल पहिल्या कसोटीत जखमी झाल्यानंतर फलंदाजीसाठी उतरला नव्हता आणि दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर राहिला. त्याच्या अनुपस्थितीत पंतने कसोटीत नेतृत्व केले. सूत्रांच्या मते, “सेलेक्टर्सना आशा आहे की गिल टी20 मालिकेपर्यंत फिट होतील.”

रोहितसोबत ओपनिंग कोण करणार?

गिल बाहेर गेल्यानंतर यशस्वी जैस्वालची वनडे संघात निवड जवळपास पक्की मानली जात आहे. तर अभिषेक शर्मा या मालिकेसाठी बॅकअप ओपनर म्हणून टीममध्ये येऊ शकतात. गोलदांजी आक्रमणाची जबाबदारी पुन्हा एकदा अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांच्या खांद्यावर असेल. नितीश कुमार रेड्डी हा चौथा पेस ऑप्शन ठरू शकतात, कारण हार्दिक पांड्या वनडे मालिकेतून उपलब्ध नसतील. तो टी20 मालिकेसाठी तयार असेल. आकाश दीपलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहला या मालिकेत विश्रांती दिली जाईल आणि ते पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पुनरागमन करतील.

फिरकी विभागात होणार मोठे बदल

अहवालानुसार, काही दिवसांपूर्वी कुलदीप यादवने लग्नासाठी सुट्टी मागितल्याने वनडे मालिकेतून जवळपास बाहेर निश्चित आहे. अशा स्थितीत वरुण चक्रवर्तीची वनडे संघात पुनरागमन होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तो अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह स्पिन आक्रमण सांभाळतील. वरुणला चॅम्पियन्स ट्रॉफी स्क्वाडमध्येही स्थान मिळवले होते आणि त्या स्पर्धेत तो खेळलेही होता. म्हणजेच वनडे मालिकेत ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि वरुण चक्रवर्ती हे तिघे खेळाडू संघात परतताना दिसू शकतात.

दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ : ऋषभ पंत (कर्ंधर), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल.

हे ही वाचा –

Ind vs Sa 2nd Test : घर पे खेल रहे हो क्या…; अंपायरची वॉर्निंग, कर्णधार ऋषभ पंतचा पारा चढला, कुलदीप यादवला नको नको ते बोलला, नेमकं काय घडलं? पाहा Video

आणखी वाचा

Comments are closed.