IPL 2026 – आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे आयपीएलचा विस्तार अडखळला
बीसीसीआयने आयपीएलमधील सामन्यांची संख्या 74 वरून 94 पर्यंत नेण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला होता. प्रसारण हक्क विक्रीतून तब्बल 48,390 कोटी रुपयांची कमाई करताना हा विस्तार टप्प्याटप्प्याने राबवण्याचे ठरले होते. मात्र सध्या या योजनेला ब्रेक लागलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकामुळे आयपीएलचा हा विस्तार अडखळला असून 2026 मध्येही फक्त 74 सामनेच खेळवले जाणार आहेत. पुढच्या वर्षीही सामने वाढीचे शक्यता नसल्याचे समोर आलेय.
आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाची कोंडी
यामागचे मुख्य कारण म्हणजे आयसीसीचे ‘भविष्य दौरा कार्यक्रम.’ एप्रिल 2027 पर्यंतचे वेळापत्रक इतके व्यस्त आहे की, आयपीएलसाठी मोठा काळच उपलब्ध नाही. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी स्पष्ट केले की, मार्चच्या मध्यापासून मे अखेरपर्यंतच मर्यादित वेळ मिळतो; जूनपासून पावसामुळे विस्तार शक्य नाही.
Comments are closed.