बीसीसीआयच्या नव्या स्पॉन्सर डीलमधून होणार कोट्यवधींची कमाई! 35 सामन्यांसाठी मिळणार इतके कोटी

बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी मायदेशातील मालिकांसाठी कॅम्पा कोला, SBI Life आणि ChatGPT यांची असोसिएट पार्टनर्स म्हणून निवड केली आहे. बीसीसीआयची जुनी असोसिएट पार्टनरशिप डील ऑगस्ट 2026 मध्ये संपली होती.
आता ही नवीन डील मार्च 2028 पर्यंत असेल. या काळात 35 सामन्यांसाठी हे तीन ब्रँड भारतीय क्रिकेट संघासोबत असोसिएट पार्टनर म्हणून जोडलेले राहतील.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जुलै महिन्यातच आपल्या इव्हेंट्ससाठी टायटल स्पॉन्सरशिप आणि असोसिएट पार्टनरचे हक्क मिळवण्यासाठी नामांकित संस्थांकडून निविदा मागवल्या होत्या. या इव्हेंट्समध्ये भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय सामने आणि रणजी ट्रॉफीसारख्या देशांतर्गत स्पर्धांचा समावेश आहे.
स्पॉन्सरशिपच्या लिलावासाठी बीसीसीआयने सुरुवातीला 13 ऑगस्ट ही तारीख ठेवली होती, तर असोसिएट पार्टनरसाठी कोटेशन जमा करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट निश्चित केली होती. टायटल स्पॉन्सर निश्चित न झाल्यामुळे बोर्डाने ही अंतिम तारीख वाढवून 7 सप्टेंबर केली होती.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अंतर्गत येणाऱ्या कॅम्पा कोलाने असोसिएट पार्टनरसाठी सर्वाधिक बोली लावली. कॅम्पा कोला प्रत्येक सामन्यासाठी 1.31 कोटी रुपये देणार आहे. तर SBI Life आणि ChatGPT या दोघांनीही प्रत्येक सामन्यासाठी 1.2 कोटी रुपयांची बोली लावली गेली आहे. कॅम्पा कोलाला बिसलेरी आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून स्पर्धा मिळाली. या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येक सामन्यासाठी 1.2 कोटी रुपयांची बोली लावली होती. मार्च 2028 पर्यंत 35 सामन्यांसाठी बीसीसीआयच्या खात्यात एकूण 129.85 कोटी रुपये जमा होतील.
मात्र, असोसिएट स्पॉन्सरचे नाव भारतीय संघाच्या जर्सीवर छापले जाणार नाही. जर्सीवर केवळ टायटल स्पॉन्सरचे नाव असते. भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा मुख्य स्पॉन्सर ‘अपोलो टायर्स’ आहे आणि त्याचे नाव जर्सीच्या पुढील बाजूला असते. असोसिएट स्पॉन्सर पार्टनर्सचे नाव आणि त्यांचा लोगो सामन्यांच्या प्रसारणादरम्यान टीव्हीवर दाखवला जातो. हा लोगो मैदानावरील ग्राफिक्सच्या माध्यमातून किंवा बाउंड्री कुशनवरही दाखवला जाऊ शकतो.
भारतीय संघाच्या (Indian cricket team) पुढील मायदेशातील मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, ही मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. (IND vs WI) वेस्ट इंडिजचा भारत दौरा 27 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमध्ये 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळले जाणार आहेत.
Comments are closed.