आता आयपीएल खेळाडूंवर दया नाही, बीसीसीआयनं नियमात केला मोठा बदल!
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावानंतर आता चाहते स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी आयपीएलचा नवा हंगाम 21 मार्चपासून सुरू होईल. आता आयपीएल सुरू होण्यापूर्वी मैदानावर खेळाडूंच्या शिस्तीशी संबंधित अनेक नियम कडक जारी करण्यात आले.
इंडियन प्रीमियर लीगनं आयपीएल 2025 च्या हंगामात मैदानावरील खेळाडूंच्या शिस्तीबाबत खूप कडक नियम जारी केले आहेत. आता आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आचारसंहितेचं पालन केलं जाईल. रविवारी झालेल्या गव्हर्निंग कौन्सिल (GC) बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत, लेव्हल 1, 2 आणि 3 च्या उल्लंघनासाठी खेळाडूंना आयसीसीच्या नियमांनुसार शिक्षा दिली जाईल.
गव्हर्निंग कौन्सिलच्या एका सदस्यानं सांगितलं की, “आतापासून आयपीएलमध्ये आयसीसीच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अटींचं पालन केलं जाईल. पूर्वी आयपीएलचे स्वतःचे वेगळे नियम होते. परंतु आता आयसीसीनं ठरवलेली आचारसंहिता लागू केली जाईल.”
वास्तविक, गेल्या हंगामात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल 10 खेळाडूंवर कारवाई करण्यात आली होता. यापैकी सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं प्रकरण होतं नाईट रायडर्सचा गोलंदाज हर्षित राणाचं. त्यानं सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर फ्लाइंग किस दिला होता. यासाठी त्याला सामना शुल्काच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला होता.
यानंतर हर्षितनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही असंच सेलिब्रेशन केलं. यासाठी त्याला त्याच्या सामना शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि पुढील सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं. असं असूनही हर्षित आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज अनकॅप्ड गोलंदाज होता.
हेही वाचा –
विराट-रोहितसह वरिष्ठ खेळाडूंना बीसीसीआयचे कडक आदेश, पालन न केल्यास परिणाम भोगावे लागतील!
विराट कोहलीने रायुडूला 2019 विश्वचषकातून जाणूनबुजून वगळले, माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप
तब्बल 8 वर्षांनंतर टीम इंडियात परतणार हा खेळाडू? 6 डावांमध्ये ठोकली आहेत 5 शतकं!
Comments are closed.