5 कसोटी, 9 वन डे आणि 8 टी-20 सामने; टीम इंडियाचा जम्बो कार्यक्रम जाहीर, मुंबई-पुणे-नागपूरमध्ये रंगणार थरार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी 2026-27 हंगामातील हिंदुस्थानच्या पुरुष संघाच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या हंगामात हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहे. एकूण 5 कसोटी, 9 वनडे आणि 8 टी-20 सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून हे सामने देशातील 17 विविध शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरमध्येही क्रिकेटचा थरार रंगणार आहे.

वेस्ट इंडिजचा संघ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 3 वन डे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये श्रीलंकेचा संघ हिंदुस्थानमध्ये 3 वन डे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येईल. यातील तिसरा टी-20 सामना पुण्यात होईल. जानेवारी 2027 मध्ये झिम्बाब्वेचा संघ 3 वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी हिंदुस्थानमध्ये येणार असून तिसरी वन डे मुंबईतील वानखेडे मैदानावर होईल. तर जानेवारी ते मार्च 2027 या काळात 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थानमध्ये येणार आहे. या मालिकेतील पहिलाच कसोटी सामना नागपूरमध्ये होणार आहे.

वेस्ट इंडिजचा हिंदुस्थान दौरा (सप्टेंबर – ऑक्टोबर 2026)

27 सप्टेंबर, 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता पहिली वन डे – त्रिवेंद्रम
30 सप्टेंबर, 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता दुसरी वन डे – गुवाहाटी
3 ऑक्टोबर,2026 रोजी 2.00 वाजता तिसरी वन डे – न्यू चंदीगड

6 ऑक्टोबर, 2026 रोजी संध्या. 7 वाजता पहिली टी-20 – लखनऊ
9 ऑक्टोबर, 2026 संध्या. 7 वाजता दुसरी टी-20 – रांची
11 ऑक्टोबर, 2026 संध्या. 7 वाजता तिसरी टी-20 – इंदूर
14 ऑक्टोबर, 2026 संध्या. 7 वाजता चौथी टी-20 – हैदराबाद
17 ऑक्टोबर, 2026 संध्या. 7 वाजता पाचवी टी-20 – बंगळुरू

श्रीलंकेचा हिंदुस्थान दौरा (डिसेंबर 2026)

13 डिसेंबर, 2026 दुपारी 2:00 वाजता पहिली वन डे – दिल्ली
16 डिसेंबर, 2026 दुपारी 2:00 वाजता दुसरी वन डे – बंगळुरू
19 डिसेंबर, 2026 दुपारी 2:00 वाजता तिसरी वन डे – अहमदाबाद

22 डिसेंबर, 2026 संध्या. 7:00 वाजता पहिली टी-20 – राजकोट
24 डिसेंबर, 2026 संध्या. 7:00 वाजता दुसरी टी-20 – कटक
27 डिसेंबर, 2026 संध्या. 7:00 वाजता तिसरी टी-20 – पुणे

झिम्बाब्वेचा हिंदुस्थान दौरा

3 जानेवारी, 2027 रोजी दुपारी 2:00 वाजता पहिली वन डे – कोलकाता
6 जानेवारी, 2027 रोजी दुपारी 2:00 वाजता दुसरी वन डे – हैदराबाद
9 जानेवारी, 2027 रोजी दुपारी 2:00 वाजता तिसरी वन डे – मुंबई

ऑस्ट्रेलियाचा हिंदुस्थान दौरा (बॉर्डर-गावस्कर ट्रॉ़फी)

21 जाने – 25 जाने, 2027 रोजी सकाळी 9:30 वाजता पहिली कसोटी – नागपूर
29 जाने – 02 फेब्रु, 2027 रोजी सकाळी 9:30 वाजता दुसरी कसोटी – चेन्नई
11 फेब्रु – 15 फेब्रु, 2027 रोजी सकाळी 9:00 वाजता तिसरी कसोटी – गुवाहाटी
19 फेब्रु – 23 फेब्रु, 2027 रोजी सकाळी 9:30 वाजता चौथी कसोटी – रांची
27 फेब्रु – 03 मार्च, 2027 रोजी सकाळी 9:30 वाजता पाचवी कसोटी – अहमदाबाद

Comments are closed.