‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिनचा BCCI कडून सन्मान, सन्मानानंतर सचिन भावुक!
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने मुंबईमध्ये स्थित असलेल्या हेडक्वार्टर्समध्ये एका बोर्ड रूमला सचिन तेंडुलकर नाव दिले आहे. याचं नावं ‘SRT 100′ ठेवण्यात आले आहे. जे भारतीय क्रिकेटसाठी सचिन तेंडुलकर यांनी योगदान दिले आहे त्याचे प्रतीक आहे. या रूमचे उद्घाटन स्वतः सचिन तेंडुलकर यांनी केले. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर या रूमचे उद्घाटन करताना बीसीसीआयचे चेअरमन रोजर बिन्नी सचिव देवजीत सैकीया आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला सहित अन्य अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
सचिनने यादरम्यान सांगितले की, भारताने 1983 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याला क्रिकेटर बनण्याची प्रेरणा मिळाली होती. त्यांनी हे देखील सांगितले ते पहिल्यांदा 1983 वर्ल्ड कप ट्रॉफी पहिल्यांदा साक्षात बघत आहेत. सचिन म्हणाले की, एक पूर्ण रूम माझ्या नावावर असणे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे.
तेंडुलकरने 1989 सालाची आठवण काढत म्हटले, त्यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल तेव्हा ठेवलं होतं, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया समोर एक छोटीशी रूम असायची. मला आजही आठवते, ते त्या दिवसात बीसीसीआयचं ऑफिस असायचं. त्याच वर्षी मी पाकिस्तान दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हापासून आज या ठिकाणी पोहोचणे खरंच अभिमानाची गोष्ट आहे.
BCCI हेडक्वार्टर्सच्या ज्या रूमला सचिनच नाव देण्यात आलं आहे, त्याला ‘SRT100′ म्हणून ओळखले जाईल. SRTचा अर्थ सचिन रमेश तेंडुलकर आहे, जे त्यांचे पूर्ण नाव आहे. तसेच 100 संख्या सचिन तेंडुलकर द्वारे आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतकांना दर्शवत आहे. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 51 आणि वनडे करिअरमध्ये 49 शतके झळकावली आहेत.
Comments are closed.