IND vs ENG: BCCI मुळे ACC अध्यक्ष मोहसिन नकवींच्या अडचणी वाढल्या, आशिया कपपूर्वी नवा गोंधळ निर्माण

आशिया कपची यंदाची जबाबदारी अद्याप निश्चित आहे. भारत आणि पाकिस्तानमधील (IND vs ENG) तणावाच्या पार्श्वभूमीवर 2025 मधील आशिया कपबाबत काहीही स्पष्ट नाही. पण याचदरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) मोठा झटका दिला आहे. बीसीसीआय आता आशियाई क्रिकेट परिषद (ACC) च्या एका मोठ्या बैठकीवर बहिष्कार घालण्याच्या विचारात आहे, ज्यामुळे पीसीबीची अडचण वाढू शकते.

क्रिकबझच्या माहितीनुसार, 24 आणि 25 जुलै रोजी बांगलादेशच्या ढाका शहरात ACC ची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचं अध्यक्षस्थान मोहसिन नकवी भूषवणार होते, जे पीसीबीचे अध्यक्ष असून एसीसीचेही अध्यक्ष आहेत. मात्र बीसीसीआयने ही बैठक ढाकामध्ये न घेता दुसऱ्या देशात हलवण्याची मागणी केली आहे आणि त्याच अटीवर आपली उपस्थिती नोंदवणार असल्याचं कळवलं आहे. भारताच्या या भूमिकेला श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांनीही पाठिंबा दिला आहे.

आशिया कप 2025 यूएई संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला जाणार असल्याचं सध्या ठरलं आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ सहभागी होणार आहेत. पण ही स्पर्धा नक्की कधी आणि कश्या पद्धतीने पार पडेल, याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही.

इंग्लंडमध्ये सध्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स या स्पर्धेचं दुसरं सत्र सुरू आहे. 20 जुलै रोजी इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात सामना होणार होता. पण भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे अखेर हा सामना रद्द करण्यात आला. आयोजकांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

यामागे 22 एप्रिल रोजी पहगाम’मध्ये झालेला अतिरेकी हल्ला कारणीभूत आहे, ज्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारतामध्ये पाकिस्तानविरुद्ध रोषाचे वातावरण आहे.

Comments are closed.