Beauty Tips : या टिप्सने मिळवा नॅचरल ग्लो

वाढत्या प्रदुषणाचा आपल्या आरोग्यासह त्वचेवर वाईट परिणाम होत आहे. त्वचेवर धूळ आणि घाण साचल्यामुळे त्वचेची संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात टॅन, मुरूमे, पिंपल्स या त्वचेच्या तक्रारींचा समावेश आहे. अशा वेळी त्वचेतील नॅचरल ग्लो टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला स्किन केअर रूटीन फॉलो करायला हवे. या स्किन केअरमधील टिप्समुळे प्रदुषणामुळे नाहीसा झालेले नॅचरल पुन्हा येण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात, नॅचरल ग्लो साठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

टिपा –

  • त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि हायड्रेट राहील. यासाठी तुम्ही दिवसभरात किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या.
  • तुम्ही फळांचे ज्सूस किंवा डिटॉक्स ड्रिंक्स पिऊ शकता. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतील आणि त्वचा उजळेल.
  • नेहमी लिप बाम सोबत ठेवावा. यामुळे थंड तापमान, प्रदुषित हवा, सूर्याच्या अतिनील किरणांपासून ओठांचे संरक्षण होईल.
  • रोजचा मेकअप करण्यासाठी उत्तम दर्जाच्या मेकअप प्रॉडक्टचा वापर करा.
  • वापरून झाल्यावर पुन्हा सर्व मेकअप प्रॉडक्ट्स व्यवस्थित पॅक करा.
  • रात्री झोपण्याआधी कितीही उशीर झाला तरी मेकअप काढूनच झोपा.
  • मेकअप काढल्यानंतर त्वचा स्वच्छ करून चेहऱ्याला मॉईश्चरायज करून झोपावे. त्वचेला मॉईश्चरायझर लावल्याने चेहऱ्यावरील पोअर्स बंद होतात आणि मुरूमे येत नाहीत.
  • आठवड्यातून कमीत कमी 1 ते 2 वेळा त्वचेला एक्सफोलिएट करावे. त्वचेला एक्सफोलिएट केल्याने मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते आणि त्वचा स्वच्छ होते.
  • सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होण्यासाठी सनस्क्रीन लावावे. यामुळे
    टॅनिंगची समस्या उद्भवणार नाही.
  • तुम्हाला वारंवार चेहऱ्याला हात लावायची सवय असेल तर आजपासून बंद करा. यामुळे हातावरील जंतू चेहऱ्यावर जमा होतात.
  • मेकअप केल्यानंतर सेटिंग स्प्रे वापरावे. यामुळे मेकअप त्वचेवर दिर्घकाळ राहतो. कधीकधी घामामुळे मेकअप खराब होतो, अशावेळी तुम्ही मेकअप स्प्रे वापरायला हवा.
  • आहारात निरोगी पदार्थ खावेत. कारण आपण काय खातो, त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
  • तुम्ही निरोगी त्वचेसाठी आहारात फळे, भाज्या, धान्ये, कडधान्ये यांचा समाविष्ट करू शकता.

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.