IND vs AUS: भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध या 5 खेळाडूंमुळे मालिका गमावली? जाणून घ्या सविस्तर

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन सामन्यांत जबरदस्त खेळ करत 2-1 ने मालिका जिंकली. मात्र तिसरा सामना भारताने जिंकत थोडी प्रतिष्ठा वाचवली.

या मालिकेत टीम इंडियातील (Team india) 5 खेळाडूंनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली, ज्यामुळे भारताला मालिका गमवावी लागली.

या खेळाडूंमध्ये पहिलं नाव आहे, के.एल. राहुलचं (KL Rahul). त्याने दोन सामन्यांत फक्त 49 धावा केल्या. श्रेयस अय्यरनेही (Shreyas iyer) दोन सामन्यांत 72 धावा केल्या.

विराट कोहलीकडून अपेक्षा होत्या, पण त्यानेही फक्त सरासरी खेळी करत तीन सामन्यांत केवळ 74 धावा केल्या. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने (Arshdeep singh) दोन सामन्यांत तीन खेळाडू बाद केले.

तर अक्षर पटेललाही (Axar Patel) काही खास कमाल दाखवता आली नाही. त्याने तीन सामन्यांत फक्त तीन विकेट्स घेतल्या.

यामुळेच या मालिकेत टीम इंडियाचा (Team india) खेळ पूर्णपणे विस्कळीत झाला आणि ऑस्ट्रेलियाने मालिका आपल्या नावावर केली.

Comments are closed.