Beed Accident – देवदर्शनाला जाणाऱ्या 6 जणांना कंटेनरनं चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू, दोघं गंभीर जखमी

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनाला निघालेल्या सहा जणांना भरधाव कंटेनरने चिरडले. बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला असून यात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी आणि मयत तरुण हे पेंडगाव येथे मारुतीच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने पायी निघालेल्या तरुणांना उडवले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, अपघातानंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी रक्तमांसाचा चिखल झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप समोर आलेली नाही. पोलीस ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
Beed Accident – देवदर्शनाला जाणाऱ्या 6 जणांना कंटेनरनं चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू, दोघं गंभीर जखमी pic.twitter.com/lusnzmkkfz
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 30 ऑगस्ट, 2025
प्रशासनाकडून उपाययोजना नाहीत
सोलापूर-धुळे महामार्गांवर काही दिवसापूर्वी गढी जवळ सहा तरुणांना भरधाव वाहनाने चिरडले होते. आता पुन्हा अशीच घटना घडली आहे. या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात ब्लॅक स्पॉट अर्थात अपघात प्रवण स्थळ आहेत, मात्र प्रशासनाकडून त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Comments are closed.