धक्कादायक! बीडमध्ये पैशांसाठी पुन्हा अपहरण, मुलगा जिवंत हवा असेल तर आता 50 हजार टाका अन्यथा…

अंडे: बीडमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. पैशांच्या वादातून हाणामारी, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, किरकोळ वादावादीतून जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाणीच्या गंभीर घटना घडत असतानाच बीडच्या धारूरमध्ये पैशांसाठी पुन्हा एकदा अपहरण झालं आहे. धारूरमध्ये उसने पैसे वसूल करण्यासाठी चार तरुणांनी एका तरुणाचे अपहरण केलं. मुलाच्या घरी फोन करून मुलगा जिवंत हवा असेल तर आताच्या आता 50 हजार रुपये टाका  अन्यथा मुलगा तुम्हाला परत दिसणार नाही अशी धमकी दिली. हा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात धारूर पोलिसांनी  दोघांना अटक करण्यात आली आहे. (Crime News)

नेमकं घडलं काय?

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे. अवघ्या 10 हजार रुपयांच्या उसनवारीवरून तब्बल 80 हजार रुपयांची वसुली करत एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी थेट तरुणाच्या आईला फोन करून धमकी दिली – “मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50 हजार पाठवा, नाहीतर तो कधी दिसणार नाही. “ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद असे आहे. कृष्णाने काही महिन्यांपूर्वी धनराज चाटे, पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आगाव यांच्याकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, आरोपींनी या रकमेवर दिवसाला 1 हजार रुपयांचे व्याज लावले होते. याच हिशेबाने व्याजाची रक्कम 80 हजारांवर गेली. पैसे मिळवण्यासाठी कृष्णाचे अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी कृष्णाच्या आईला फोन करून 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलाला सोडणार नाही, अशी थेट धमकी देण्यात आली. घाबरलेल्या आईने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

दोघांना अटक, दोन जण फरार

या प्रकरणात धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे. तर दोघेजण फरार आहेत. कृष्णा मैंद असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृष्णा याने धनराज चाटे पृथ्वीराज राग व परमेश्वर आगाव यांच्याकडून पैसे उसने घेतले होते त्याचे व्याज दिल्याचे कारण सांगत या तिघांसह अन्यकाने कृष्णाचे अपहरण केले होते. या प्रकरणात धारूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

दहा हजार रुपयाला एक हजार रुपये रोज!

अपहरण करणाऱ्या आरोपींनी कृष्णा याला जे दहा हजार रुपये दिले होते त्याला एक हजार रुपये रोजाप्रमाणे व्याज होते आणि त्याचेच 80 हजार रुपये झाल्याने अपहरणासारखा प्रकार आपण व मारहाणी सारखा प्रकार या आरोपींनी केला हा प्रकारा अतिशय गंभीर असून आता पोलीस या आरोपींनी अशा पद्धतीने इतर काही गुन्हे केले आहेत का याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

आणखी वाचा

Comments are closed.