अखंड हरीनाम सप्ताहावरून घरी जाताना शिवराज दिवटेला टोळक्याने घेरलं, बेदम मारहाण, बीड पोलिसांची म
बीड गुन्हा: मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खूनाचा भयंकर प्रकार घडून गेल्यानंतरही बीडमध्ये अमानुष मारहाणीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. परळीमध्ये अखंड हरीनाम सप्ताहावरून परत येताना परळीमधील टोकवाडी परिसरात एका युवकाला दहा बारा जणांनी रिंगण करून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. रत्नेश्वर टेकडी येथे लिंबुटा येथील शिवराज दिवटे या युवकाला 10 ते 12 जणांनी केलेल्या जबर मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला होता. या प्रकारानंतर परळी पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. या घटनेनंतर 10 आरोपी आणि अनोळखी 10 अशा 20 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. (Beed Crime)
ही धक्कादायक घटना शिवराज दिवटे हा जलालपूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून परतत असताना घडली. मारहाण करणारे सर्वजण अज्ञात होते. रस्त्यात अडवून, टेकडीवर नेऊन तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शिवराज दिवटे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Beed Crime) या प्रकारामुळे संपूर्ण परळी शहरात एकच खळबळ उडाली आहे. पीडिताच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सात संशयितांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
परळी मारहाणप्रकरणी 7 जण ताब्यात
या प्रकरणात परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच तातडीने पावले उचलत पोलिसांनी तेलगाव येथून चौघांना उचलले आहे तर इतर तिघांना परळी परिसरातून अटक केले आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बीएनएस कलम 109, 126(2), 140(3), 118(1),189(2),189(4),190, 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.
बीडमध्ये गुन्हेगारीचं करायचं काय?
मस्साजोगसारख्या भयंकर अमानुष आणि निर्घृण घटनेनंतरही बीड जिल्ह्यात सततच्या गुन्हेगारीवर चाप बसत नाही. गुन्हेगारी घटनांमुळे बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यातून आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. बीड बसस्थानकात (Beed bus depot) रात्रीच्या सुमारास चोरट्यांकडून एका वृद्ध महिलेच्या कानातील सोने हिसकावून घेताना चक्क कान तुटल्याने महिला जखमी झाली आहे. नागाबाई मंजुळे (वय 60) असं महिलेचे नाव आहे. चोरी, लुटमार आणि पाकीटमारीचे प्रकार वाढल्यामुळे बस स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा:
Beed Crime: बीडमध्ये चोरांचं भयंकर कृत्य, चोरट्यांनी सोन्याचे कानातले ओरबाडले, महिलेचा कान तुटला
अधिक पाहा..
Comments are closed.