Beed news – पिंपळनेर शिवरात अफूच्या शेतीवर पोलिसांचा छापा; साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपळनेर पोलीस पथकाने पिंपळनेर शिवारात एका शेतावर छापा टाकून कांद्याच्या पिकात लपवून केलेली अफूची बेकायदेशीर लागवड उघडकीस आणली. या कारवाईत सुमारे 42 किलो पेक्षा जास्त वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी रोजी पिंपळेनर पोलिसांना विशाल भगवान इतापे (वय – 29, रा. पिंपळनेर) याने आपल्या शेतात अफूच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केल्याची माहिती मिळाली. त्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सदर शेतावर छापा टाकण्यात आला. यात कांदा आणि लसूण पिकाच्या मध्यभागी लागवड केलेली अफूची झाडे दिसून आली. ती झाडे पोलिसांनी उपटून जप्त केली. त्याचे वजन 42 किलो 355 ग्राम एवढे असून बाजारात त्याची किंमत 10 लाख 58 हजार 875 एवढे आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उप अधीक्षक पुजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि घुगे,, पोउनि. गोलवाल, शिंदे, आत्माराम गर्जे, वनवे, घुमरे, ढाकणे, तावरे व चालक पवार यांच्या पथकाने केली .महसूल विभागाचे प्रतिनिधी म्हणून ग्राम महसूल अधिकारी प्रशांत ढोले, कृषी सहाय्यक शिंदे हे उपस्थित होते.
Comments are closed.