शिवराज दिवटे मारहाण प्रकरण, धनंजय मुंडेंनी घेतली शिवराजची भेट, नेमकं काय म्हणाले मुंडे?
शिवराज डिव्हाइस प्राणघातक हल्ला प्रकरण: बीड (Beed) जिल्ह्यात मधील परळी येथे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शिवराज दिवटे (Shivraj Divate) या तरुणाला समाधान मुंडे (Samadhan Munde) आणि त्याच्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या टोळक्याने त्याचे अपहरण करून त्याला डोंगराळ भागात नेले आणि बांबू व लाकडी दांडक्यांनी अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात (Beed Crime) खळबळ उडाली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवराज दिवटे (Shivraj Divate) याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर अनेक राजकीय नेते त्याची रुग्णालयात भेट घेत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शिवराज दिवटेची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.
संदिपान दिवटे आणि सुरेश दिवटे हे आमच्या कुटुंबातल्या सदस्यांसारखे आहेत. कोणत्या कारणाने भांडण झाले आणि त्याला कोणी कोणी मारलं याचा तपास पोलिसांनी केला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये कसल्याही प्रकारच्या जातीपातीच्या कारणावरुन भांडण झालेलं नाही. आता त्याचं नेमकं कारण काय? काही दिवसात याचे कारण पोलिस सांगतील असे मुंडे म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
बीडच्या परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव आहे. एका टोळक्याने त्याचे अपहरण करुन त्याला डोंगराच्या भागात नेले आणि बांबू आणि लाकडाने बेदम मारहाण केली होती. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात (Beed Crime) एकच खळबळ माजली होती. मारहाण झाल्यानंतर शिवराज दिवटे (Shivraj Divte) गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सगळ्या प्रकारानंतर शनिवारी शिवराज दिवटे याने ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्याने आपल्याला लोखंडी रॉड आणि कत्नीने मारहाण झाल्याचे सांगितले. तसेच टोळक्यातील काहीजण, ‘याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा ‘, असे म्हणत असल्याचेही शिवराजने सांगितले.
मी जलालपूर येथे सप्ताहाच्या जेवणासाठी गेलो होतो, जेवणानंतर तिथे काही भांडण लागले होते तिथे मी भांडण पाहायला उभा होतो. त्यानंतर शिवाजीनगरला मी मित्राला सोडून रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होतो, हे मारणाऱ्यांना माहिती होते.पेट्रोल पंपाजवळ तर पाच गाड्यावरील पोरांनी रस्ता रोखत मला मारहाण केली व मला रत्नेश्वर डोंगरावर घेऊन गेले. मला मारहाण करताना ते बोलत होते की, ‘याला सोडायचे नाही, याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा’. ते मला मारून टाकत होते. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. दोन माणसांनी जर मला मारताना बघितलं नसतं तर मी जिवंत राहत नव्हतो. लोखंडाची रॉड, कत्ती,लाकूड यांनी मला मारहाण केली. माझ्या डोक्यात बाटली देखील मारण्यात आली, पण ती फुटली नाही. सर्व आरोपी गांजा प्यायले होते, असे शिवराज दिवटे याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
शिवराज दिवटे मारहाणप्रकरणावरुन परळीतील वातावरण पुन्हा तापलं, उद्या बीड बंदची हाक, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
अधिक पाहा..
Comments are closed.