याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा, मारहाण कराताना बीडमधील गँग गांजाच्या नशेत, शिवराज दिवटेचा दाव

बीड टॉक न्यूज: बीडच्या परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव आहे. एका टोळक्याने त्याचे अपहरण करुन त्याला डोंगराच्या भागात नेले आणि बांबू आणि लाकडाने बेदम मारहाण केली होती. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात (Beed Crime) एकच खळबळ माजली होती. मारहाण झाल्यानंतर शिवराज दिवटे (Shivraj Divte) गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सगळ्या प्रकारानंतर शनिवारी शिवराज दिवटे याने ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्याने आपल्याला लोखंडी रॉड आणि कत्नीने मारहाण झाल्याचे सांगितले. तसेच टोळक्यातील काहीजण, ‘याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा ‘, असे म्हणत असल्याचेही शिवराजने सांगितले.

मी जलालपूर येथे सप्ताहाच्या जेवणासाठी गेलो होतो, जेवणानंतर तिथे काही भांडण लागले होते तिथे मी भांडण पाहायला उभा होतो. त्यानंतर शिवाजीनगरला मी मित्राला सोडून रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होतो, हे मारणाऱ्यांना माहिती होते.पेट्रोल पंपाजवळ तर पाच गाड्यावरील पोरांनी रस्ता रोखत मला मारहाण केली व मला रत्नेश्वर डोंगरावर घेऊन गेले. मला मारहाण करताना ते बोलत होते की, ‘याला सोडायचे नाही, याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा’. ते मला मारून टाकत होते. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.
दोन माणसांनी जर मला मारताना बघितलं नसतं तर मी जिवंत राहत नव्हतो. लोखंडाची रॉड, कत्ती,लाकूड यांनी मला मारहाण केली. माझ्या डोक्यात बाटली देखील मारण्यात आली, पण ती फुटली नाही. सर्व आरोपी गांजा प्यायले होते, असे शिवराज दिवटे याने सांगितले.

Beed Police: परळीतील मारहाण प्रकरणाला जातीय रंग देऊ नका: पोलीस अधीक्षक नवनीत काँवत

परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तत्कालिक कारणातून झाली आहे. या प्रकरणाला कुठलाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आले असून दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिली.

Anjali Damania on Beed: परळी हा दहशतवादाचा अड्डा झालाय, ऑपरेशन सिंदूरसारखं ऑपरेशन राबवा: अंजली दमानिया

बीडचं परळी दहशतीचा अड्डा झाला आहे. खरंच याला गंभीरतने घेतलं पाहिजे. काल जी मारहाण झाली त्यामध्ये सगळी मुलं 18 वर्षांची होती. या सगळ्या मुलांची मारहाण बघून, ज्याला मारलं त्याला पाया पडायला लावलं, त्यावरुन असं वाटतंय की, ही रिव्हेंज केस आहे. हे सगळं भलत्याचा दिशेने चाललंय. ऑपरेशन सिंदूरप्रमाणे बीडमध्ये एखादं ऑपरेशन राबवलं पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=beebt7j97ca

आणखी वाचा

खंड हरीनाम सप्ताहावरून घरी जाताना शिवराज दिवटेला टोळक्याने घेरलं, बेदम मारहाण, बीड पोलिसांची मोठी कारवाई

अधिक पाहा..

Comments are closed.