सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकानं आयुष्य संपवलं; पोलिसांना सापडली 4 पानी सुसाईड नोट
अंडे: गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे . सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकाने आत्महत्या केली आहे . राम असाराम फटाले (42)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने चार पानी सुसाईड नोट ठेवली होती . या सुसाईड नोटमध्ये भाजप भटके विमुक्त आघाडीचे डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या नावासह त्यांच्या पत्नीचाही उल्लेख करण्यात आलाय .या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय .पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय .
बीड जिल्ह्यात वाढत चाललेल्या पतसंस्था, सावकारांचं जाळं आणि होणाऱ्या फसवणुकीच्या अनेक घटना गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत . काही दिवसांपूर्वीच लेकीच्या लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने वडिलांनी पथसंस्थेच्या गेटलाच गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. ही घटना ताजी असतानाच सावकारी जाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे .
नेमके प्रकरण काय?
सावकारी जाचामुळे बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. राम आसाराम फटाले (वय 42, रा. बीड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी चार पानी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये सात जणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. यामध्ये भाजपा भटके विमुक्त आघाडीचे डॉ. लक्ष्मण जाधव आणि राम फटाले यांच्या पत्नीचाही उल्लेख आहे. घटनेनंतर पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशी सुरू केली. राम फटाले यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये, भाजप भटके विमुक्त आघाडीचे डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या नावासह त्यांच्या पत्नीचाही उल्लेख करण्यात आलाय.
या प्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात डॉ. लक्ष्मण जाधव यांच्यासह सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. असे पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज यांनी सांगितले.
काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये?
प्रिय आई व पप्पा सुजल व गौरी रेणुका,मी चांगला मुलगा पती वडील होऊ शकलो नाही तरी मला माफ करा..रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई-वडील सुजल व गौरी यांची काळजी घ्यावी लागेल..शाम भाऊ लखन माझे मुले व बायको आई वडील यांचा सांभाळ करा व मला माफ करा..तुमचा सर्वाचा राम…माझे वडील यांच्याकडे माझी माती करण्यासाठी रुपये नाहीत.. माझी माती समाजाकडून वर्गणी करून करावी.. माझा दहावा, तेरावा, चौदावा करू नका.. कुणालाही मयतीला बोलावू नका.. वर्षश्राद्ध करू नका ही माझी इच्छा आहे… असे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.