माणुसकीला काळीमा फासणारी घटना! बीडमध्ये पाळीव कुत्र्याला अमानुष मारहाण, डोळ्यात चाकूने वार
![beed](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/beed--696x447.jpg)
बीडमधून माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. माणसांप्रमाणेच जनावरेही असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. येथे एका व्यक्तीने पाळीव कुत्र्याला अमानुष मारहाण करून त्याच्या डोळ्यात चाकू खुपसला आहे. या घटनेचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पिपल्स फॉर एनिमल्स (PFA) या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर सदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही घटना 9 फेब्रुवारीला घडल्याचे समजते. किरण सुनील साबळे (30) असे त्या आरोपीचे नाव आहे. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे, किरणने आपल्या पाळीव कुत्राच्या गळ्याला फास लावला. मात्र, भरपूर हालचाल करून कुत्र्याने स्वत: ला सोडावले. यानंतर किरणने त्या कुत्र्याला खूप मारहाण केली. एवढेच नाही तर त्या नराधमाने कुत्र्याच्या डोळ्यात चाकू खुपसला. त्यामुळे कुत्र्याच्या डोळ्याला भीषण दुखापत झाली आहे.
सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही आरोपीला ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच PFA च्या अधिकाऱ्याने कुत्र्याचे प्राण वाचवले असून त्याला सरकारी पशु चिकित्सालयात दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान
Comments are closed.