बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या, अभ्यासाचा ताण,कुटुंबाच्या अपेक्षांचा भार

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यासाचा ताण आणि कुटुंबाच्या अपेक्षांचा भार सहन झाला नाही. ऑनलाइन सुरा मागवून या विद्यार्थ्याने गळा चिरून घेतला. उत्कर्ष महादेव शिंगणे (19) असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने पुण्यात आत्महत्या केली. भोपाळमधील ‘एम्स’ वैद्यकीय महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता.
मूळचा बीड येथील रहिवासी उत्कर्ष महादेव शिंगणे हा भोपाळमध्ये ‘एम्स’ वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असून पुण्यात लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी आला होता. महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात त्याने स्वतःचा गळा चिरून घेतला. उत्कर्षच्या आत्महत्येची घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी उत्कर्ष हा अभ्यासामुळे तणावात होता. त्यातच कुटुंबाच्या अपेक्षांचे ओझेही त्याच्यावर होते.
व्हॉट्सअॅपवरून पालकांना पाठवली सुसाईड नोट
उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी पालकांना व्हॉट्सअॅपवर एक सुसाईड नोट पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबातील सदस्यांनी सकाळी मेसेज पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आले. उत्कर्षचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
Comments are closed.