त्यानं नर्तिकेवर जीव ओवाळून टाकला, ती मात्र संपर्कात राहिना; बीडच्या माजी उपसरपंचानं स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवलं

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय – 34) यांनी सोलापुरातील बार्शीजवळील ससुरे येथे डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. एका नर्तिकेच्या नादी लागून बर्गे यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे.
गोविंद जगन्नाथ बर्गे यांना लोकनाट्य कलाकेंद्राची आवड लागली होती. दीड वर्षापूर्वी एका कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकसोबत त्यांची ओळख झाली. आधी मैत्री आणि नंतर प्रेमाचे संबंध झाले. बर्गे यांनी नर्तिकेवर जीव ओवाळून टाकाला. विवाहित असतानाही पूजाला जे पाहिजे ते उपलब्ध करून दिले. मात्र गेल्या काही काळापासून पूजा गोविंद बर्गे यांना टाळत होती. तिने संपर्क तोडल्याने नैराश्येत गेलेल्या बर्गे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
गोविंद बर्गे विवाहित होते. गेल्या काही वर्षापासून त्यांना लोकनाट्य कला केंद्रात जाण्याचा नाद लागला होता. दीड वर्षापूर्वी थापडी तांडा या कला केंद्रामधील पूजा गायकवाड या नर्तिकेसोबत त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रित आणि मैत्रिचे प्रेमात झाले. नर्तिकेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या गोविंद बर्गे यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पावणे दोन लाख रूपयाचा खर्च केला. एक मोबाईलही तिला भेट दिला.
गोविंद सातत्याने पूजाच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अलिकडच्या काळात पूजा त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली होती. त्याच्याशी संपर्कही साधत नव्हती. त्यामुळे नैराश्यात असलेल्या गोविंदने सोमवारी मध्यरात्री आपल्या कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ड्रायव्हर सिटवर असलेले गोविंद मृतावस्थेत आढळला. उजव्या बाजूने झाडलेली गोळी डाव्या बाजूने बाहेर पडली होती. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराईच्या घरासाठी नर्तिकेचा तगादा
नर्तिकेने गोविंदसोबत प्रेमसंबंध ठेवले. वेळोवेळी पैसे आणि सोनेही लुबाडले. मोबाईलही घेतला. गोविंदच्या मिळालेल्या पैशातून नर्तिकेने जमीन खरेदी केली. तरी तिची भूक भागेना. अजून पाच एकर शेती भावाच्या नावावर आणि गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर असा तगादा पूजाने गोविंदकडे लावला होता. यामुळेच ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे गोविंदचा मृतदेह ज्या गाडीमध्ये सापडला ती गाडी पूजा गायकवाड (रा.सासुरे, ता.बार्शी, जि.सोलापूर) हिच्या घरासमोर उभी होती. गाडीमध्ये पिस्तूलही सापडले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments are closed.