Beed News – फरार कृष्णा आंधळे तीनदा गावात येऊन गेला, धनंजय देशमुख यांचा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे हा तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेला असा धक्कादायक खुलासा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे. ही माहिती आम्हाला मिळाली आहे. ती आम्ही सीआयडी कार्यालयाला कळवली आहे.

कृष्णा तीनवेळा गावात येऊन गेल्याची माहिती खरी आहे. त्यांनी देखील हे मान्य केले आहे की, आरोपी गावात येवून गेला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पण आरोपी मोबाईल वापरत नाही. त्यामुळे तपास यंत्रणांना त्याला शोधण्यात अडचण येत आहे असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमाशी बोलताना हा दावा केला आहे. पुढे ते म्हणाले की, यावर काय करायचं आणि कशा पद्धतीने त्या आरोपीला जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करू, कारण या आरोपीपासून आमच्या सर्व कुटुंबाला जिवितास धोका आहे. हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सर्व लोक आहेत.

आम्ही ही मागणी केली आहे लवकरात लवकर कृष्णा आंधळेच्या मुसक्या आवळून पोलीस प्रशासनाने त्याची धिंड काढावी. आणि त्याला जेरबंद करावे अशी मागणी आहे असे धनंजय देशमुख म्हणाले. या खून प्रकरणात अद्याप कृष्णा आंधळे हा फरार आहे. तो जिवंत आहे की त्याचा गेम झाला याविषयी शंका व्यक्त होत होत्या. पण त्याच्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. मागच्या काही दिवसात जो लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबला दिला होता. त्यामध्ये पूर्ण रिकव्हरी आलेली आहे. पुढील सुनावणीत सर्व साक्षीदारांची यादी देण्यात येणार आहे. लवकरच साक्षी पुराव्याची यादी दिली जाणार आहे. लवकरात लवकर ही केस मार्गी लागावी अशी माझी मागणी आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले. येत्या ६ मार्चला होणार्‍या सुनावणीत आम्ही आरोपींची संपत्ती जप्त करण्याविषयी पाठपुरावा करण्यास कुठे कमी पडणार नाही. विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी वकील यांनी याचा पाठपुरावा केला आहे. जे सीज केलेले अकाऊंट आहेत ते लवकरच जप्त करण्यात यावेत यावर आम्ही एक पाऊल उचलणार आहोत हे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल, असे धनंजय देशमुखांनी स्पष्ट केले.

Comments are closed.