Santosh Deshmukh Case – आरोपींनी फाशी होत नाही, तोपर्यंत एकही सण साजरा करणार नाही; मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्धार

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिने झाले आहेत. मात्र अद्यापही या हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. पोलीस अद्यापही त्याचा शोध घेऊ शकले नाही. यातच आज मस्साजोग ग्रामस्थांनी होळी सण साजरा केला नाही. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत गावात एकही सण साजरा न करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. संताष देशमूख यांना क्रूर वागणूक देत त्यांची हत्या करण्यात आली होती. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जनतेच्याही संतापाच्या उद्रेक झाला आहे. यातच आज मस्साजोगच्या ग्रामस्थांनी प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Comments are closed.