कागदपत्र देत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच दिरंगाई; उज्वल निकम अन् आरोपींच्या वकिलामध्ये खडाजंगी
बीड वार्ता: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्वाची अपडेट पुढे आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 24 मार्च 2026 रोजी होणार आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत, अशा सूचना सरकारी पक्षाला न्यायालयाने दिल्या आहेत. तर जेल ट्रान्सफर संदर्भात विष्णू चाटेच्या अर्जावर आज ऑर्डरची शक्यता आहे. दुसरीकडे आरोपी महेश केदार याच्याकडून नवीन वकिलाची नियुक्ती करण्यात आली असून विवेकानंद सानप हे महेश केदारचे नवे वकील असतील, अशी माहिती आहे. (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case)
Santosh Deshmukh Case : आरोपी पक्षाकडून दिरंगाई केल्याचा आरोप; उज्वल निकम यांच्यात खडाजंगी
दरम्यान, आज सुनावणी दरम्यान जयराम चाटेकडून कोर्टाकडे अर्ज दाखल करण्यात आली आहे. भावाच्या मृत्यूनंतर धार्मिक विधीसाठी जाण्यास परवानगी द्यावी, 13 तारखेला हा धार्मिक विधी आहे. या साठी दाखल अर्जावर सरकारी पक्षाकडून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सुप्रीम कोर्टाची वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावरील ऑर्डर कोर्टामध्ये सादर करण्यात आलीय. तर जयराम चाटेकडून कोर्टाला दुसरा अर्ज माझं वकील पत्र हे फक्त वाघीरकर वकिलांकडेच असेल. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपी पक्षाकडून दिरंगाई केल्याचा आरोप केला होता. यावर आरोपीच्या वकिलांकडून सरकारी पक्ष आम्हाला कागदपत्र देत नाही, सरकारी पक्षाकडूनच उलट यात दिरंगाई केली जात असल्याचे कोर्टाला सांगण्यात आलंय. यावेळी काही काळ आरोपीचे वकील आणि उज्वल निकम यांच्यात खडाजंगी झाल्याचंही बघायला मिळालंय.
राजाभाऊ फड वर Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी आजवर परळीतील दहा लोकांना संपवले; राजाभाऊ फड यांचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजेभाऊ फड यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन आल्याने थांबला गेला होता.आता या प्रकरणातील संशयित असलेल्या लोकांच्या ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्ट झाल्या आहेत त्यामध्ये जे काही समोर आले आहे ते जाहीर करावे तसेच या प्रकरणात धनंजय मुंडे यांना 120 ब कलमाप्रमाणे आरोपी करावे अशी मागणी फड यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी आजवर परळीतील दहा लोकांना संपवले आहे त्यांची नावे देखील आमच्याकडे आहेत.आजवर हे कुठल्याही खून प्रकरणाचा तपास होऊ देत नव्हते.. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला असता तर बापू आंधळे व संतोष देशमुख हत्या प्रकर घडलेच नसते असा दावा देखील फड यांनी केला आहे.महादेव मुंडे यांच्या प्रकरणात संशयित असलेल्या लोकांच्या टेस्ट करण्यात आले आहेत त्यानुसार कारवाई करावी.. अन्यथा आम्ही दिनांक 20 मार्च नंतर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.