Beed News – बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती, ट्रकचालकाला डांबून ठेवले; मग अमानुष छळ करत हत्या

बीड जिल्हा अपहरण, मारहाण आणि मृत्यूच्या घटनेने पुन्हा एकदा हादरला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येची घटना ताजी असतानाच आष्टी तालुक्यात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. ट्रक मालकाने चालकाला डांबून ठेवत अमानुष छळ करत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विकास बनसोडे असे मयत चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते.

विकास बनसोडे हा मूळचा जालना येथील रहिवासी आहे. बीडमधील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर नामक व्यक्तीच्या ट्रकवर तो चालक होता. बनसोडे आणि क्षीरसागर यांच्यात काही कारणातून वाद झाला. यानंतर क्षीरसागर याने बनसोडेला दोन दिवस डांबून ठेवले. यादरम्यान त्याला सतत बेदम मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप बनसोडेचा भाऊ आकाशने केला.

याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून, पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीडमधील मारहाणीच्या घटनांनी राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दररोज बीडमधून अशा घटना समोर येत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments are closed.