राखेची बेकायदा वाहतूक करण्याऱ्या डंपरने सरपंचाचा बळी घेतला, बीडमधली धक्कादायक घटना
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाली होती. ही घटना ताजी असताना बीडमध्येच राखेच्या डंपरची दुचाकीला धडक लागली आहे आणि या अपघातात एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे.
अभिमन्यू क्षीरसागर हे सौंदाना गावाचे सरपंच होते. ते आपल्या दुचाकीने जात होते, तेव्हा राखेच्या डंपरने त्यांना धडक दिली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हेल्मेट असूनही क्षीरसागर यांचा जीव वाचू शकला नाही. धक्कादायक म्हणजे हा डंपर बेकायदा राखेची वाहतूक करत होता.
परळीत पवनचक्कीच्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. आता बीडमध्येच एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या अपघाताप्रकरणी संशय व्यक्त केला आहे. हा अपघात आहे की घातपात याची चौकशी झाली पाहिजे, तसेच बीडमध्ये राखेची अवैध वाहतूक सुरूच आहे असा आरोपही धस यांनी केला.
Comments are closed.