Beed sarpanch deshmukh murder case ajit pawar statement asj
बीडमध्ये झालेल्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होणारच, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शवला आहे. बारामतीमध्ये बोलताना त्यांनी शब्द दिला.
पुणे : खातेवाटप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. रविवारी (22 डिसेंबर) बारामतीमधील नागरी सत्कार समारंभादरम्यान त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी बीडमधील सरपंच देशमुख यांच्या हत्येवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, “कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल देशमुख यांच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? हे शोधून काढणार आहे,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला. (Beed sarpanch deshmukh murder case ajit pawar statement)
हेही वाचा : Chhagan Bhujbal : बॅनरवर फोटो नसला तरी…; त्या प्रकरणावर काय म्हणाले छगन भुजबळ?
– Advertisement –
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “मी बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात सिव्हिल सर्जनशी बोललो. यावेळी त्यांनी सांगितले की, सरपंच देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. पण हे असले प्रकार शिव-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. मी पोलिसांना सांगितले आहे की, गुन्हेगार कोणीही असला तरीही त्याला सोडू नका. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाणार आहे. अशा घटनांमुळे आम्हाला शर्मेने मान खाली घालावी लागते. या शहाण्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय सोडायच नाही,”
पुढे महाविकास आघाडीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, “महाविकास आघाडीला अपयश पचवता आलेले नाही. ईव्हीएमवर काही नेत्यांनी संशय घेतला. कार्यकर्त्यांना बरे वाटावे म्हणून त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली आहे.” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, “लोकसभेला 48 हजारांनी माझा उमेदवार मागे होता. कार्यकर्ता कामाला लागला. कोणावरही टीका करायची नाही, असे आम्ही ठरवले होते. आम्ही मतदारांना आवाहन करत होतो. यानंतर विधानसभेत आम्हाला जनतेने भुतों न भविष्यती असे यश दिले.” असे म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले.
– Advertisement –
“3 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करायचा आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांची गरज पडली तर त्यांची मदत घेऊन काम करू. काही कार्यकर्ते काम घेतात आणि नेते दुसऱ्याला विकतात असले धंदे आता बंद करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकतेला साथ द्यायचे ठरवले आहे. आम्हाला मलिदा गँग बगैरे म्हटले गेले. 1980 मध्ये शरद पवारांना खताळ पट्टाने विरोधात मतदान केले होते. पण 88 टक्के मते मला याच गावाने दिली. जे काम करतात ते राहतात बाजूला, जे मराठी येतात सांगतात दादा हे झाले पाहिजे आणि ते झाले पाहिजे. मी डोक्याला सांगत होतो, 23 पर्यत थांब,” असे म्हणत त्यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
Comments are closed.