Beed Sarpanch Santosh Deshamukh murder case BJP Suresh Dhas press conference asj


बीड : महाराष्ट्रामध्ये सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. अशामध्ये आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषणा केली की, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करतील, असेही त्यांनी सांगितले. (Beed Sarpanch Santosh Deshamukh murder case BJP Suresh Dhas press conference)

हेही वाचा : Tanaji Sawant : …तर तुमचाही संतोष देशमुख करू; माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्यांना धमकी 

– Advertisement –

“मी आधी एसआयटीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर सोमवारी (24 डिसेंबर) रात्री मला मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वीय्या सहाय्यक पळसकर यांचा मला फोन आला होता. यावेळी त्यांनी कालच मुख्यमंत्र्यांनी आदेशावर सही केली आहे, असे सांगितले” अशी माहिती भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. “पोलिस महानिरीक्षक स्तरावरील वरिष्ठ अधिकारी या घटनेचा तपास करणार आहेत. तसेच, या प्रकरणात न्यायालयीन चौकशीदेखील केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण मनावर घेतलेले आहे.” असे ते पुढे म्हणाले.

“संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 15 दिवसांचा पीसीआर मिळाला ही समाधानाची बाब आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्याची संधी मिळेल. फक्त बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात लोकांच्या मनात रोष आहे. कोणालाही ही घटना पटलेली नाही. काल सर्वपक्षीय बैठक झाली असून काही निर्णय झाले आहेत. संपूर्ण बीड जिल्हा एकवटला आहे,” असे आमदार सुरेश धस पुढे म्हणाले. “मी कोणत्याही आकाला घबराट नाही. 9 तारखेला जेव्हा घटना घडली तेव्हा आका त्याच परिसरात होता. तो आका सध्या रिसॉर्ट बांधत असून शेतकऱ्यांना धमकी देऊन कामे सुरू आहे,” असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. “परळीमधील दुबे प्रकरणात देखील आका आहेत. ते प्रकरण किती लाखात मिटले हे मला माहिती आहे. पिडीत लोकं माझ्याकडे येणार आहेत,” असे ते पुढे म्हणाले.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.