आशिया कप 2025 पूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंना होणार कोट्यवधींचं नुकसान? बोर्डाची वाढली चिंता

भारत सरकारने काही काळापूर्वी संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 मंजूर केले. यामुळे आता ड्रीम 11 सारख्या अ‍ॅपवर बंदी लागू होऊ शकते. ड्रीम 11 अनेक वर्षांपासून टीम इंडियाचा जर्सी स्पॉन्सर होता. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे ही डील सुमारे वर्षभरापूर्वीच संपली आहे. याशिवाय खेळाडूंनाही ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपमधून उत्पन्न मिळत होते, तेही आता बंद होऊ शकतं. सरकारच्या या निर्णयामुळे बीसीसीआयला आता कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.

ड्रीम 11 आणि बीसीसीआयचे नाते आता संपुष्टात आले आहे. यामुळे बोर्डलाही मोठं नुकसान होऊ शकते. फक्त बीसीसीआयच नाही तर खेळाडूंनाही याचा फटका बसणार आहे. टीम इंडियाचे जवळपास सर्व खेळाडू ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्सचं प्रमोशन करत होते. अशा परिस्थितीत या विधेयकामुळे खेळाडूंनाही मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. क्रिकबझच्या एका अहवालानुसार, या विधेयकाच्या मंजुरीमुळे भारतीय खेळाडूंना सुमारे 150 ते 200 कोटींचे नुकसान होऊ शकते. विराट कोहलीला अंदाजे 10 कोटी तर धोनी आणि रोहितला 6 ते 7 कोटींचा तोटा सहन करावा लागू शकतो.

टीम इंडियाचा जर्सी स्पॉन्सर असलेल्या ड्रीम 11 व्यतिरिक्त अजूनही अनेक अ‍ॅप्स बंद होऊ शकतात. यामुळेच आयपीएलवरही धोका निर्माण झाला आहे. माय 11 सर्कल दर हंगामाला बीसीसीआयला 125 कोटी रुपये देतो. अशा परिस्थितीत ही डीलही आता संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे बीसीसीआयला दुहेरी तोटा सहन करावा लागू शकतो. याशिवाय KKR, LSG आणि SRH सारख्या संघांनाही फटका बसणार आहे. इतर संघांनाही नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments are closed.